आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली रे... मुंबई मेट्रो ! दरवाढीचा वाद न्यायालयात सोडवणार - मुख्यमंत्री चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बहुप्रतिक्षीत मेट्रो रेल्वेचे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो धावली आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे अनेक नेते आणि लोकप्रतिनीधी उपस्थित होते. दुपारी 1 पासून घाटकोपर ते वर्सोवा या 11.7 कि.मी अंतरावर नियमीत मेट्रो धावणार आहे.

औपचारिक उदघाटनानंतर वर्सोवा स्टेशनहून मेट्रो घाटकोपर पर्यंत धावली. मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख अनिल अंबानी, टिना अंबानी, भाजप नेते किरीट सोमय्या, खासदार पुनम महाजन यांनी देखील वर्सोवा ते घाटकोपर असा प्रवास केला आहे. मेट्रो प्रवासानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकर 21व्या शतकातील प्रवास करतील असा विश्वास व्यक्त केला. (काय म्हणाले मुख्यमंत्री वाचा पुढील स्लाइडमध्ये )

11 किलोमीटर मेट्रो प्रवासाच्या तिकीट दरावरुन राज्य सरकार आणि रिलायन्स यांच्यात वाद असल्याचे शनिवारी समोर आले होते. हा वाद न्यायालयाच्या सुनावणीनंतर दर निर्धारण समिती सोडवेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी निविदेतीलच दर कायम ठेवावे असा पवित्रा घेतला होता, तर रिलायन्सने 10 ते 40 रुपये दर आकारण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, आजपासून (रविवार) सुरु झालेल्या मेट्रोचे दर प्रारंभीचा एक महिना केवळ 10 रुपये असणार आहे. एक महिन्यानंतर रिलायन्स कोणते दर आकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दहिसर ते बोरिवली 'मेट्रो 2' लवकरच सुरु करु, असा विश्वास भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी आहे मेट्रो आणि मेट्रोतून कशी दिसते मुंबई