आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai: Metro Service Begins Between Versova & Ghatkopar

मुंबई मेट्रोच्या सफरीवर पोहचले अनिल अंबानी पत्नी टीनासह, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मायानगरी मुंबईत अखेर रविवारी वर्सोवा -अंधेरी- घाटकोपर या मार्गावरील मुंबई मेट्रो रेल्वे सेवा रविवारी अखेर सुरू झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पहिली मेट्रो ट्रेन रवाना झाली. मेट्रोच्या पहिल्या दिवशी 2 लाख मुंबईकरांनी प्रवास केल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले. तसेच 11.4 किमीचे अंतर केवळ 21 मिनिटांत पार केले. पूर्वी घाटकोपरवरून अंधेरीला जाण्यासाठी बस किंवा इतर कोणत्याही वाहनाने तब्बल एक ते दीड तास लागत होता. मात्र, मेट्रो रेल्वेने केवळ 21 मिनिटांत हे अंतर कापता येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. सकाळी साडेपाच ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. सुरुवातीला एका महिन्यासाठी या गाडीचे तिकीट 10 रुपये असेल. मात्र एका महिन्यानंतर प्रवाशांना 10 ते 40 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
मेट्रोचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, उद्योगपती अनिल अंबानी, त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनाचा दिवस हा मुंबई शहरासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अनेक अडचणींवर मात करत मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यात यश आल्याने खूप समाधान वाटत आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात मेट्रो प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरेल. तिकीट दराबाबत रिलायन्स आणि सरकार यांच्यातील वादावर लवकरच तोडगा निघेल. तसेच नवी मुंबई, पुण्यातही लवकरच मेट्रो धावणार अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी दिली.
पुढे पाहा मेट्रोच्या उद्घाटनादरम्यानची छायाचित्रे....