आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्राे रेल्वे धावणार ठाण्यापर्यंत; २ प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजूरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईची मेट्राे रेल्वे ठाण्यापर्यंत विस्तारण्याचा महत्त्वपूर्ण िनर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मेट्राे मार्ग- दाेन अाणि मेट्राे मार्ग- चार या दाेन प्रकल्पांना मंजूरी देण्यात अाल्यामुळे अाता कफ परेड ते ठाणे दरम्यान ही रेल्वे धावणार अाहे.
मेट्राे २ ब हा मार्ग डीएन नगर ते मंडाले असा २३ िकलाेमीटरचा अाहे तर मेट्राे चारचा मार्ग वडाळा- घाटकाेपर- मुलूंड- ठाणे- कासारवडवली असा २३.२३ िकलाेमीटरचा अाहे. मेट्राेचे भाडे ठरवण्याची जबाबदारी ‘एमएमअारडीए’वर असेल. प्रकल्पासाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जमिनी एमएमअारडीएकडे नाममात्र दराने देण्यात येतील. तसेच अांतरराष्ट्रीय संस्थांनी सहमती दर्शविल्याप्रमाणे बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार अाहे. हे दाेन्ही प्रकल्प सार्वजनिक िनकडीचे प्रकल्प म्हणून मान्य करण्यात अाले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...