आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याला मंजुरी; 24 हजार कोटी खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. राज्य शासनाने या प्रकल्पाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे पाठवला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प मुंबईच्या परिवहन व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कुलाबा-वांद्रे-विमानतळ-सिप्झ असा हा 32 किलोमीटरचा मार्ग असून त्यावर 27 स्थानके असतील. हा संपूर्ण मार्ग भूमिगत असून त्यावरून रोज 22 लाख प्रवासी प्रवास करतील. या प्रकल्पाचा खर्च 24 हजार 340 कोटी रुपये आहे.

केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्रत्येकी 50 टक्के निधीची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात याच आर्थिक वर्षात होणार असून सहा वर्षांत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने हा प्रकल्प राबवला जाईल. दक्षिण मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ही दोन व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, तसेच विमानतळ यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.