आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांच्या सेवेत आजपासून ‘मेट्रो’; तिकीट दरावरून वाद, मुख्यमंत्री नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आजपासून राज्यातील पहिली मेट्रो रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यातील वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो मार्गावरील मेट्रोचे आज लोकार्पण होत आहे. खचाखच भरलेल्या उपनगरीय रेल्वेने जीव मुठीत घेऊन प्रवास करणार्‍या मुंबईकरांना मेट्रोचा प्रवास एक नवा अनुभव देणारा ठरेल. चार महिन्यांपूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2014 रोजी चेंबूर- वडाळादरम्यान देशातील पहिली मोनोरेल सुरू झाली. त्यानंतर आता मुंबईकरांना ही सुविधा मिळत आहे.

वर्सोवा ते घाटकोपर या 12 किमी मार्गावरील प्रवास फक्त 21 मिनिटात आलिशान वातानुकूलित मेट्रोतून करता येईल. मात्र, नमनालाच तिकीट दरावरून वाद उद्भवला असून दर वाढवले तर उद्घाटनाला येणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. दुसरीकडे रिलायन्सने मुख्यमंत्री आले नाहीत तरी उद्घाटन होणारच, अशी भूमिका घेतली आहे.

2006 मध्ये ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या आधारावर रिलायन्स एनर्जीला मुंबई मेट्रोचे काम देण्यात आले. रिलायन्स व एमएमआरडीएकडून यासाठी ‘मेट्रो वन’ ही कंपनी स्थापन करण्यात आली होती.

पुढे वाचा, काँग्रेसचा घास भाजपने पळवला