आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांसाठी खूषखबर: घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर उद्यापासून मेट्रो धावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईकरांसाठी एक खूषखबर असून उद्यापासून पहिल्या टप्प्यातील घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रो धावणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रा. लि. कंपनीचे मुख्य अधिकारी अभय मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता स्वतहून मेट्रोचे उद्घाटन करणार असे काल जाहीर करताच रिलायन्स इन्फ्राचा सहभाग असलेल्या कंपनीचे धाबे दणाणले होते. त्यानंतर काल दिवसभर मॅरेथॉन बैठकीनंतर कंपनीने यावर तत्काळ पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर ज्यामुळे मेट्रो रखडली होती त्या तिकीट दराचाही तिढा सोडविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप मेट्रोचे वेळापत्रक व तिकीट दर जाहीर केले गेले नाहीत.
मेट्रोचा पहिला टप्पा तयार असून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर उद्घाटनाचा मुहूर्त निघत नव्हता. याबाबत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला. मेट्रो सुरु करण्यास सरकार टाळाटाळ का करीत आहे असा सवाल करीत सोमय्या यांनी मुंबईकरांचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, मेट्रो सुरु होणार असल्याच्या घोषणेनंतरही सोमय्या यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच्या नाकर्ते सरकारमुळेच मेट्रो इतक्या दिवस रखडली. 3 वर्षाचा प्रकल्प 10 वर्षे चालला. आता मेट्रोचे सर्व काम संपल्यानंतर व परवानग्या मिळाल्यानंतरही तिकीट दर ठरत नसल्यामुळ मुंबईकरांसाठी वेठीस धरले जात आहे. त्यामुळेच आपण स्वत शनिवारी दुपारी तीन वाजता मेट्रोचे उदघाटन करणार आहोत. सरकार आणि रिलायन्स कंपनीत तिकीट दर ठरविण्यावरून वाद सुरु आहे. सरकार मागे सरायला तयार नाही व कंपनीही त्यामुळे मेट्रो धावण्यासाठी सज्ज असूनही मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.