आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार रस्त्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वर्ष लोटल्यानंतरही सोडतीमधील घर न मिळाल्याने संतप्त झालेल्या हजारो गिरणी कामगारांनी शुक्रवारी सीएसटी रस्त्यावर आंदोलन केले. रास्तो रोको करणार्‍या 700 कामगारांना पोलिसांनी अटक करून सोडून दिली.

गेल्या वर्षी म्हाडाने कामगारांसाठी बांधलेल्या घराची सोडत काढली होती. त्यात 6 हजार 925 गिरणी कामागारांना घरे मिळाली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन कामगारांना घरांच्या चाव्याही देण्यात आल्या. परंतु वर्षभरात केवळ 300 कामगारांनाच घराचा ताबा देण्यात आला. घरे तयार असताना ते देण्यात विलंब का, असा सवाल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भाड्याने देण्यासाठी मुंबईत 50 हजार घरे बांधली आहेत. त्यातील काही घरे गिरणी कामगारांना देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही, असा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर यांनी केला.