आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MLC निवडणूक: मनसे तटस्थ राहणार, काँग्रेसच्या भाई जगतापांचा मार्ग मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे (फाईल फोटो) - Divya Marathi
राज ठाकरे (फाईल फोटो)
मुंबई- या महिन्याअखेर होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतील दोन जागांसाठी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक आहेत. मनसेच्या या निर्णयामुळे भाजपच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या भाई जगतापांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 8 जागांसाठी 27 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेच्या दोन जागा आहेत. शिवसेनेतर्फे शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपतर्फे नगरसेवक मनोज कोटक यांनीही अर्ज दाखल केला आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ 75 पेक्षा अधिक असून रामदास कदम यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्यामुळे केवळ दुस-या जागेबाबत उत्सुकता आहे. दुस-या जागेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप, भाजपकडून मनोज कोटक तर राष्ट्रवादीचे नेते प्रसाद लाड यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. लाड यांनी मात्र आपण बंडखोरी केली नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
भाई जगतापांचा मार्ग मोकळा-
दुस-या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याविरोधात भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. तर भाजपकडे 32 नगरसेवक आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मनसे व सपाच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र, मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाई जगतापांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना-75 + 13 (अपक्ष)= 88
भाजप- 31 + 1 (अपक्ष) = 32
काँग्रेस- 52
राष्ट्रवादी- 13
मनसे- 28
सपा- 09
शेकाप-01
अपक्ष-04
पुढे पाहा, मनसेचे अधिकृत निवेदन...
विद्यमान आमदार व दोन्ही भाई विधान परिषदेत पुन्हा जाणार...
बातम्या आणखी आहेत...