आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणप्रकरणी ताज हॉटेलला दोन कोटींचा दंड, हल्ल्यानंतर केले होते अतिक्रमण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अतिक्रमण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने हॉटेल ताजला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०११ मध्ये हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने रस्त्यावर व पदपथावर बॅरिकेड्स लावून अतिक्रमण केले होते. त्यामुळे पालिकेने ताजला हा दंड ठोठावला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे म्हणाले, शुक्रवारी आम्ही हॉटेल ताजकडून झालेल्या अतिक्रमणाची पाहणी केली. ३० मार्च रोजी ताजला दोन कोटी १६ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. ही रक्कम १५ दिवसांत भरणा करायची होती. मात्र, अद्याप हॉटेलने ही रक्कम भरणा केली नसल्याचे फणसे म्हणाले.