आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्यापासून दरराेज ८ टन कोळशाच्या विटा, मुंबई महापालिकेचा पथदर्शी प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सबंध जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे कचरा. मुंबईत दररोज १० हजार टन कचरा पडतो. मुंबई महापालिकेने त्यातील हरित कचऱ्यांपासून कोळशाच्या विटा बनवण्याचा प्रकल्प घाटकोपर येथे सुरू केला आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुरू केलेला हा प्रकल्प सध्या देशभर नावाजला जात आहे. घाटकोपर रेल्वे मार्गाजवळ १ हजार चौरस मीटर जागेवर पूर्वी अतिक्रमण होते. महापालिका प्रशासनाने ही जागा पाच वर्षांच्या कराराने चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशिप संस्थेला दिली. आज तेथे रोज १६ टन झाडांच्या पाचोळ्यापासून ज्वलनशील पॅलेट्स व बिक्रेट्स तयार होत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी िदली. लवकरच त्याची क्षमता ४० टन केली जाईल. पश्चिम उपनगरातही असे प्रकल्प कार्यन्वित करण्यात येणार आहेत.
कचरा बनला मोलाचा
१. स्वच्छ मुंबई-स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई महापालिका ‘हागणदारीमुक्त बृहन्मुंबई’ हा प्रकल्प सध्या जोमाने राबवत अाहे.
२. सॅनिटरी पॅड आणि डायपर्सच्या कचऱ्यातील वाटा सहा टक्के आहे. नॅपकिन, डायपर्स कचऱ्यातून अलग करून तो जाळून टाकण्यासाठी मानखुर्द येथे पालिकेने एक भट्टी उभारली आहे.
३. हरित कचऱ्यापासून तयार करण्यात येत असलेले दंडगोलाकृती (ग्रीन पॅलेट्स) व छोट्या विटेसारखे दिसणारे (बिक्रेट्स) एक प्रभावी ज्वलनशील इंधन समजले जाते.