आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai MNC Ready To Appoint Marshal In Mumbai Again

मुंबईत पुन्हा ‘मार्शल राज’चा प्रस्ताव, सार्वजनिक ठकाणी थुंकल्यास जागेवर दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत सार्वजनिक ठfकाणी यापुढे कागदाचा तुकडा जरी हातून खाली पडला किंवा रस्त्यावर थुंकीची पिचकारी मारली तर नागरिकांच्या खिशाला चांगलीच चाट पडू शकते. कारण वादात अडकलेली मार्शल योजना पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचाली मुंबई पालिकेत सुरू आहेत.

मुंबईत जेवढा झगमगाट आहे त्यापेक्षा अस्वच्छता अधिक आहे. शहराचा चेहरा विद्रूप करणाऱ्या या सवयींना चाप लावण्यासाठी २००७ मध्ये मार्शल याेजना आणली होती. ४३७ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेली मुंबई एकूण २४ वाॅर्डांमध्ये विभागलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या, थुंकणाऱ्या व्यक्तींना जागेवर आर्थिक दंड करण्याचे अधिकार या मार्शलना देण्यात आले होते. त्यासाठी पालिकेकडून ३७३ मार्शलची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु हे मार्शल मुंबईचे ‘घाशीराम कोतवाल’ ठरले होते. स्वच्छतेच्या आडून मनमानी पद्घतीने त्यांनी दंड आकारून लाेकांना हैराण केले होते. या योजनेस खंडणीचे स्वरूप आले होते. अखेर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मार्शलना आवरा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे स्वच्छता ठेवण्यासाठी बनवलेली मार्शल योजना २०११ मध्ये गुंडाळण्यात आली. ती वादग्रस्त मार्शल याेजना सप्टेंबरमध्ये पुन्हा आणण्याचा घाट घातला जात आहे. प्रत्येक वॉर्डात ३० मार्शल नियुक्त केले जाणार आहेत.
तक्रारींसाठी कक्ष
१ मार्शलविरोधात तक्रारीसाठी प्रत्येक वाॅर्डामध्ये कक्ष असेल. त्यामुळे मनमानी पद्धतीने आणि बेकायदा पैसा मार्शल वसूल करू शकणार नाहीत, असा पालिका प्रशासनाला विश्वास वाटतो आहे.
२ नागरिक पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये कचरा टाकतात. त्यामुळे नाले तुंबून पूरस्थिती ओढवते. मार्शलच्या धाकाने नागरिकांच्या या कचराफेकीला आळा बसेल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.