Home »Maharashtra »Mumbai» Mumbai Mns Gudhipadwa Melava Cancelled By Raj Thackeray

मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द; दुसऱ्याच वर्षी परंपरा खंडित, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

दिव्य मराठी वेब टीम | Mar 21, 2017, 05:39 AM IST

  • मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द; दुसऱ्याच वर्षी परंपरा खंडित, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
मुंबई- शिवसेनेच्या दसरा मेळावा परंपरेला उत्तर देण्यासाठी गेल्या वर्षी सुरू केलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या परंपरेत दुसऱ्याच वर्षी खंड पडला आहे. यंदा शिवाजी पार्कवर होणारा गुढीपाडवा मेळावा मनसेने रद्द केला आहे.
“कृष्णकुंज’वर आयोजित बैठकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गुढीपाडवा मेळावा रद्द केल्याची माहिती दिली. मात्र, स्थानिक पातळीवर गुढीपाडवा जल्लोषात साजरा करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. खासगी कारणाने परदेशात जात असल्याने यंदा गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होता येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या वर्षीपासून मनसेने गुढीपाडवा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. शांतता क्षेत्र असतानाही भाजप सरकारने मनसेला शिवाजी पार्कात हा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दिली होती. यंदा हा मेळावा होण्याबाबत अनिश्चितता असल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने दोन दिवसांपूर्वीच प्रकाशित केले होते.


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended