आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Model Rape Case, Every Day New Information Come Outside

मॉडेल बलात्कारप्रकरणी रोज नवे व रंजक खुलासे; खरे काय \'त्या\' दोघांनाच ठाऊक?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रात संबंधित मॉडेल माध्यमांशी बोलताना)
मुंबई- मुंबईतील आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या मॉडेलबाबत रोज नवे नवे व रंजक खुलासे होत आहेत. संबंधित मॉडेलने केवळ फुकटची प्रसिद्धी मिळविण्यासाठीच बलात्काराचे कुभांड रचल्याचा आरोप तिच्याच वकीलाने केल्यानंतर मॉडेलनेही याला प्रत्त्युत्तर दिले आहे. पारसकर यांनी माझ्या वकीलाला विकत घेतल्याचे संबंधित मॉडेलने आता म्हटले आहे.
सुनील पारसकर यांनी बलात्काराच्या आरोप प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी जज वृषाली जोशी यांच्यासमोर झाली. यावेळी पारसकर यांच्या वकीलाने संबंधित मॉडेलने सुनियोजित कटाचा भाग म्हणून बलात्काराचे कुभांड रचल्याचा आरोप केला. तसेच यासोबत त्यांनी मॉडेलचा वकील रिझवान सिद्दीकीने पोलिसांत सादर केलेली व्हिडिओ टेप व सीसीटीव्हीचे फुटेज पुरावा म्हणून सादर केला. याबाबत बोलताना पारसकर यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितले की, संबंधित महिला मॉडेलने पारसकर यांना गोवण्यासाठीच नियोजनबद्ध काम करून आडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता तिचे पितळ उघडे पडले आहे.
पारसकरांवर केलेले आरोप फेटाळून लावताना त्यांचे वकील म्हणाले, पारसकांवरील बलात्काराचे आरोप बलात्काराच्या घटनेच्या सात महिन्यांनंतर का केली? यापूर्वीच तिने तक्रार का नोंदवली नाही. पारसकर यांनी 1 डिसेंबर 2013 रोजी तिचा विनयभंग केला व नंतर 7 डिसेंबर 2013 रोजी तिच्यावर मालाडच्या मढ आयलंड येथील एका बंगल्यात बलात्कार केला असे मॉडेल तक्रारीत म्हणत आहे. मग जर 1 तारखेला तिचा विनयभंग केला होता तर ती विनयभंग करणार्‍या व्यक्तीबरोबर 7 दिवसांनी पुन्हा मढ आयलंडच्या बंगल्यात कशी काय जाते.? यावरूनच्या तिच्या हेतूबद्दल संशय येतो.
पारसकर यांनी दारू पिऊन बलात्कार केला, असे मॉडेलचे म्हणणे आहे तर बलात्कारादरम्यान या मॉडेलने स्वसंरक्षणासाठी आरडाओरड का नाही? तिने पारसकरांना हिसका देत दूर का लोटले नाही? या घटनेनंतरही ती पारसकरांना कशी काय भेटत राहिली? असा सवाल करीत पारसकर यांच्या वकीलाने मॉडेल आणि पारसकर यांच्या कुटुंबियाबाबत माहिती दिली. या घटनेनंतर काही दिवसानी पारसकर यांनी या मॉडेलला आपल्या पत्नीसोबत हॉटेलात जेवायला नेले होते. त्यावेळी हे दोन तास एकत्र होते. त्यावेळी संबंधित मॉडेलने पारसकर यांच्या पत्नीला याबाबत माहिती का दिली नाही?. तसेच या मॉडेलने पारसकर यांना महागडे मोबाईल्स, महागडी घड्याळे, परफ्युम्स भेट म्हणून दिलेली आहेत. ज्या व्यक्तीने बलात्कार केला त्याला कुणी असे महागडे गिफ्ट देतो काय, असा सवालही ऍड. मर्चंट यांनी उपस्थित केला.
पारसकर जेलमध्ये की बाहेर याचा फैसला आज, वाचा पुढे....