आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 9 मिनिटांत 9 किलोमीटर अंतर कापेल देशातील पहिली मोनो रेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील पहिली मोनो रेल सेवा मुंबईत लवकरच सुरु होत आहे. मोनो रेलमुळे मुंबईतील गर्दीचा प्रवास आता अधिक सुलभ होण्याची आशा मुंबईकरांना आहे. मोनो रेल फ्रेबुवारीत मुंबईतून धावेल असे सांगितले जात आहे. मोनो रेलसाठी आवश्यक असणारी सुरक्षा प्रमाणपत्रे सरकारकडे एमएमआरडीएने सादर केली आहेत. आता प्रतिक्षा आहे केवळ मुर्हूताचा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार लवकरच याबाबत घोषणा करणार आहे. पंतप्रधान मनमोहनसिंह या मोनो रेलला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यांची उदघाटनाची वेळ मिळाली ती मोनो रेल अखेर मुंबईकरांच्या सेवेत रूजू होईल. फ्रेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात ही सेवा होईल असे सांगितले जात आहे.
त्यापूर्वी आपण पाहूया, मुंबई मोनो रेलची लक्ष वेधून घेणारी छायाचित्रे...