आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा, वाचा मुंबईकरांच्या नव्या लाईफलाईनविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील पहिल्या मोनो रेल सेवेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज दुपारी चारच्या सुमारास थाटात उदघाटन झाले. वडाळा ते चेंबूर या मोनो रेल गाडीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदिल दाखविताच उपस्थित मुंबईकरांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईच्या या नव्या लालपरीला हिरवा कंदिल दाखविला असला तरी मुंबईकर उद्या सकाळी सात वाजल्यानंतरच यातून प्रवास करू शकणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील ही मोनो रेल वडाळा ते चेंबूर यादरम्यान धावेल. 8.26 किलोमीटर अंतर असलेला हा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक 15 मिनिटांनी मोनो रेल सुटेल. यासाठी दिवसभर सहा मोनो रेल धावतील.
पुढे वाचा, मोनो रेलविषयी खास माहिती...