आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Commissioner Sitaram Kunte May Transfer This Month

मुंबई विकास आराखड्यावर भाजप-सेना नाराज, आयुक्त कुंटेंची उचलबांगडी निश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक दर्जाचे शहर अशी गणना होत असलेल्या मुंबई शहराच्या आगामी 20 वर्षाच्या विकास आराखड्यावर राजकीय व सामाजिक स्तरातून टीका होत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेनेही आता मुंबई विकास आराखड्यावरून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखडा बनवण्याचे काम ज्या कंपनीला दिले त्या कंपनीने तो न बनवता दुस-याच कंपनीने बनविल्याचे पुढे आल्याने मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्याबाबत फडणवीस सरकार नाराज झाले आहे. त्यामुळेच मुंबईचे आयुक्तपद भूषवत असलेल्या सीताराम कुंटे यांची उचलबांगडी निश्चित असल्याचे मानले जात आहे.
कुंटे यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीस येत्या 1 मे रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बदली होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सव्वा ते दीड कोटी लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविणा-या मुंबई महापालिकेच्या आयुक्ताला मोठे महत्त्व असते. गेली तीन वर्षे या पदावर कुंटे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांची नियुक्ती केली होती. तीन वर्षाच्या कारकिर्दीत कुंटे हे फारसे वादात सापडले नाहीत. मात्र, मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपसह सर्वच प्रमुख पक्ष हे कुंटे यांच्यावर नाराज आहेत. या नाराजीमुळे सीताराम कुंटे यांची बदली निश्चित असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचे कळते आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. याशिवाय शिवसेनेनेही निवडणुकीसाठी मोर्चेबॅचंधणी सुरू केली आहे. मात्र, मुंबई विकास आराखड्यावरून दोन्ही पक्षावर जनता नाराज झाली आहे. इतर पक्षांनीही जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी तर मुंबईतील प्रतिष्ठित नागरिकांचा एक परिसंवाद घडवून हा आराखडा कसा बेकार आहे हे मुंबईकरांच्या पुढे आणले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आयुक्त म्हणून कुंटे यांना आणखी संधी देतात की आयुक्तपदी नवा चेहरा आणतात, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. नवे आयुक्त नेमायचे झाल्यास देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विश्वासात घेणार काय? याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पुढे वाचा, कोण होऊ शकतो मुंबई महापालिकेचा नवा आयुक्त...
विकास आराखड्याबाबत भाजप-शिवसेनेचे काय आहे म्हणणे...