आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Construct Dam In Thane

मुंबई पालिका ठाणे जिल्ह्यातील पिंजाळ नदीवर धरण बांधणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्याठी मुंबई पालिका ठाणे जिल्ह्यातील पिंजाळ नदीवर आठ हजार कोटी रुपये खर्चून नवे धरण बांधणार आहे. गेली सात वर्षे या धरणासाठी पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठपुरावा चालवला होता. त्यास अखेर यश आले आहे.

मुंबईकरांना प्रतिदिन 4 हजार 200 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र, पालिका सध्या प्रतिदिन 3 हजार 500 दशलक्ष लिटर्सच पाणीपुरवठा करू शकते. ठाणे जिल्ह्यात असणार्‍या पाच धरणांमधून पालिका पाणी वाहून आणते. अप्पर वैतरणा हे पालिकेच्या मालकीचे पाचवे धरण मागच्या वर्षी बांधून पूर्ण झाले आहे.

राज्य शासनाने पिंजाळ धरणाच्या बांधकामाला नुकतीच मंजुरी दिली आहे. 316 चौ. कि. मी. पाणलोट क्षेत्र असणार्‍या या प्रस्तावीत धरणाला आठ हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. राज्य शासन आणि केंद्र सरकार त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

316 कि.मी. पाणलोट क्षेत्र
सध्या मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 25 लाख असून भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवे जलस्रोत विकसित करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले होते. पिंजाळ नदीवर धरण बांधण्याबाबत पालिकेने गेली सात वर्षे पाठपुरावा चालवला होता.