आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Corporator Going To Gujrat

गुजरातमधील विकास पाहायला निघाले नगरसेवक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई महापालिकेच्या सुधार समितीचे 16 नगरसेवक गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेला बहुचर्चित विकास पाहण्यासाठी चार दिवसांच्या अभ्यास दौर्‍यावर निघाले आहेत. मोदी यांनी तेथील शहरांचा केलेला कायापालट पाहण्यासाठी सुधार समितीचा दौरा आयोजित करावा अशी सत्ताधारी सदस्याची मागणी होती. बर्‍याच वादविवादानंतर त्यासाठी तारीख निश्चित झाली आहे. 2 ते 6 मार्च असा चार दिवसांचा हा दौरा असणार आहे. त्यासाठी 3 लाख खर्च येणार आहे.
जामनगर, अहमदाबाद, नरोडा, गांधीनगर आदी शहरांना सदस्य भेट देतील. या दौर्‍यावर काँग्रेस, राष्‍ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला असून या पक्षांचे 14 सदस्य दौर्‍यावर जाणार नाहीत. पालिकेत युतीची सत्ता असून मनसे विरोधी पक्षात आहे. आम्ही दौर्‍यात स्वखर्चाने सहभागी होणार आहोत, अशी माहिती मनसेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी दिली.