आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Do Compalusory Audit To The Old Construction

जुन्या इमारतींचे मुंबई पालिका करणार सक्तीचे ऑडिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माहिम येथे इमारत कोसळून दहा जणांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाली आहे. 30 वर्षे जुनी झालेल्या सर्व इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटची सक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सोमवारी रात्री कोसळलेल्या या इमारतीला 1984 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यामुळे जेमतेम 28 वर्षे वयोमान असलेली ही इमारत कशी काय कोसळली, असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने समिती नियुक्त केली असून समितीचा अहवाल तीन दिवसांत मिळणार आहे. ढासळलेल्या इमारतीच्या डेब्रिजचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 30 वर्षांपेक्षा जुन्या असणा-या सर्व खासगी आणि सरकारी इमारतींचे दहा वर्षांतून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असा मुंबई महापालिकेचा नियम
आहे, परंतु हा दंडक कोणी पाळत नाही.