आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भावनिक राजकारण सुरु; BJP च्या 227 उमेदवारांनी घेतली पारदर्शकतेची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या सर्व अर्थात 227 उमेदवारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण देणाऱ्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत प्रचाराचा श्रीगणेशा केला. सर्व उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली. भाजपने नव्या रणनीतीला सुरुवात केली असून ते भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे.

उमेदवारांचा मेळावा... 
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सर्व उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतील 227 उमेदवार हजर होते.

पुढील स्लाइडवर वाचा... भाजपच्या 227 उमेदवारांनी घेतलेली शपथ जशीच्या तशी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...