आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांना एबी फाॅर्म अजून वाटलेले नाहीत; दानवे, राऊत यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नगरपालिका निवडणुकीत युतीचा िनर्णय जाहीर करण्याआधीच भाजप व िशवसेनेकडून इच्छुक उमेदवारांना एबी फाॅर्मचे वाटप केल्याची चर्चा सुरू झाल्याने दाेन्ही पक्षांतील कार्यकर्ते संभ्रमात पडले हाेते. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच िशवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चेचे खंडन केले. दाेन्ही पक्षांकडून अजून उमेदवारांना एबी फाॅर्मचे वाटप करण्यात आलेले नाही, असे दाेघांनीही स्पष्ट केले.

युती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व िशवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी घेतला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांशी चर्चेची अाैपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दानवे व राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीचा निर्णय जाहीर केला हाेता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना दाेन दिवस अाधी युतीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे दाेन्ही पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमित झाले अाहेत. त्यातच दाेन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांना एबी फाॅर्मचे वाटप केल्याचीही चर्चा हाेत हाेती. मात्र त्यावर अाता पडदा पडला अाहे.

स्वबळावर लढण्याचा प्रश्नच नव्हता : राऊत
िशवसेनेकडून अजून एबी फाॅर्मचे वाटप झालेले नाही. स्वबळावर निवडणुकांना सामोरे जा, असा आदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आला नव्हता. त्यामुळे एबी फाॅर्मचे वाटप करण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सांिगतले.

लवकरच फाॅर्म वाटप करू : रावसाहेब दानवे
एबी फाॅर्म वाटपानंतर युतीची घोषणा झाल्याच्या चर्चेत तथ्य नाही. स्वबळासाठी तयार राहा, असे आम्ही यापूर्वी सांगत असलो तरी एबी फाॅर्मचे वाटप केले नाही. लवकरच फाॅर्म वाटप केले जातील, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...