आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापालिकेने घेतला उंदरांचा धसका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जूनमधल्या पहिल्याच पावसाने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे भयानक परिणाम अाता मुंबईत दिसू लागले आहेत. शहरात लेप्टोस्पायरोसिसच्या साथीने आत्तापर्यंत १४ नागरिकांचा बळी घेतल्याने पालिका प्रशासन हादरले असून लेप्टोच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणा-या उंदरांना मारण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मुंबईत गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात डेंग्यूने थैमान घातले होते. यंदा मात्र लेप्टोचा प्रादुर्भाव वाढला असून मालाड ते दहिसर या पश्चिम उपनगरात लेप्टोच्या साथीने थैमान घातले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात लेप्टोचे ८६ रुग्ण आढळले असून यामध्ये बळी गेलेल्यांचा आकडा १४ झाला आहे. पालिकेने लेप्टोच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी १४ हजार ६७९ घरांमध्ये ५७ हजार ७३७ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तापाचे ५२ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.