आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला शह देण्याची शिवसेनेकडून तयारी; उद्धव यांनी घेतली नगरसेवकांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र,राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपचे पुढचे लक्ष्य अाहे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्तेचे. यासाठी मित्रपक्ष शिवसेनेची सर्व स्तरांवर कोंडी करण्याचे डावपेच केले जात आहेत.

याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी सायंकाळी महापौर बंगल्यात तातडीने अापल्या नगरसेवकांची बैठक घेतली. अतिशय गाेपनीय पद्धतीने भाजपच्या रणनीतीचा सामना कसा करायचा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात अाली. त्यासाठी नगरसेवकांना माेबाइल खासगी सचिव अाणण्यासही मज्जाव करण्यात अाला हाेता.

मुंबईतील इमारत बांधकामांच्या िनयमावली पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर झाले. खरे तर हा विषय महापालिकेशी संबंिधत असल्याने हा कार्यक्रम महापौर बंगल्यावर होणे अपेक्षित हाेते. मात्र, पालिका प्रशासनाने शिवसेनेलाच अंधारात ठेवून हा कार्यक्रम उरकला. या कार्यक्रमात बांधकामांिवषयीच्या ११९ िनयम, अटी कमी करून त्यांची संख्या ५३ वर आणण्यात आणण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

एवढा मोठा निर्णय घेताना शिवसेनेला विचारलेही नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापले अाहेत. दहा मंत्री असले तरी सरकारमध्ये शिवसेनेला महत्त्व दिले जात नाही. त्यातच अाता महापालिकेतही शिवसेनेला डावलून सरकार निर्णय घेत असल्याकडे नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंचे लक्ष यापूर्वीच वेधले हाेते. त्यामुळे वेळीच सावध हाेऊन स्वबळावर पालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरेंनी हालचाली सुरू केल्या आहेत.

बिल्डरांना खुश करण्याचा प्रयत्न
बांधकाम निययमावलीत िशथिलता आणल्यामुळे सध्या िबल्डर लाॅबी भाजपवर खुश अाहे. पुढील वर्षी हाेणाऱ्या पालिका निवडणुकीत या बिल्डरकडून भाजपला माेठी अार्थिक ताकद मिळू शकते. याशिवाय निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवूनच मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या अायुक्तपदी अजय मेहता यांना अाणून प्रशासनावरही सरकारचा अंकुश ठेवण्याची रणनीती मुख्यमंत्र्यांनी अाखली अाहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष अाशिष शेलार यांनीही काही महिन्यांपासून मनपा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून थेट शिवसेनेशी पंगा घेणे सुरू केले अाहे. तसेच बिगर मराठी वाॅर्डात माेर्चेबांधणीही केली अाहे. अाता भाजपने मराठीबहुल भागांकडे लक्ष केंद्रित केले असून आता सातत्याने तेथे बैठका घेतल्या जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...