आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेसारख्या पक्षाशी सौम्य भूमिका घेणे गरजेचे, भाजप अध्यक्ष शहांबरोबरच्या बैठकीत संघ नेत्यांचा सूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या  शिवसेनेबाबत  भाजपकडून घेण्यात आलेली  आक्रमक भूमिका बरोबर नव्हती. हिंदुत्वाविषयी दोन्ही पक्षांची भूमिका सारखी असल्याने समान विचार असलेल्या  पक्षाशी सौम्य भूमिका घेणे गरजेचे आहे. निवडणुका झाल्यानंतर तशी पावले भाजपने उचलली हे चांगले झाले, असा सूर संघाच्या नेत्यांनी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत लावल्याचे  समजते.    
 
वरळीच्या यशवंत भवन येथे  शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी, कृष्णा गोयल यांच्याबरोबर  अमित शहा यांच्याबरोबर  बैठक झाली. ही नेहमीची बैठक असल्याचे सांगितले जात असले तरी समविचारी पक्षांशी भाजपने जुळवून घ्यायला  हवे. शिवसेना, अकाली दल, महाराष्ट्र गोमंतक पक्ष हे भाजपबरोबर असले तरी अकाली दल सोडता शिवसेना तसेच महाराष्ट्र गोमंतक पक्षाबरोबर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला जुळवून घेता आले नव्हते. मात्र, आता निवडणुकांनंतर भाजपने पवित्रा बदलल्याचे दिसते. संघाने यादृष्टीने पावले उचलल्याने  हा बदल झाल्याचे  बाेलले जाते. मुंबई महापालिका निवडणुकीत अचानक भाजपने पवित्रा बदलून महापौरपदाच्या माघार घेत शिवसेनेचा मार्ग मोकळा केला, तर गोवा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच  भाजपने महाराष्ट्र गोमंंतक पक्षाशी जुळवून घेण्यासाठी पावले टाकायला  सुरुवात केल्याचे दिसते.  संघाच्या नैत्यांबरोबरची बैठक आटोपल्यानंतर अमित शहा हे लगेचच दिल्लीला रवाना झाले.  
 
‘सामना’वरील बंदीची मागणी अयोग्य  
निवडणुकांमध्ये शिवसेनेविरोधात भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतल्याने संघाचे नेते नाराज होते. याचदरम्यान    ‘सामना’वरील बंदीची मागणी योग्य नसल्याचे संघ नेत्यांचे म्हणणे होते. 
बातम्या आणखी आहेत...