आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पालिकेची २७ परवानग्यांना मूठमाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बांधकाम, उद्योगाशी संबंधित मुंबई महापालिकेकडून विविध ४६ परवानग्या दिल्या जात असत. त्यात आता मोठी कपात करण्यात आली असून २७ परवाने रद्द करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी घेतला. इझ आॅफ डुइंग बिझनेस हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय होता, त्याची अंमलबजावणी करुन पालिका निवडणुकीच्या ताेंडावर भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धोबीपछाड देत निवडणुकीत या निर्णयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला अाहे.

‘मुंबई महापालिका अधिनियम १८८८’ अंतर्गत मनपा हद्दीत एखादी वस्तू किंवा वस्तूवर प्रक्रिया उद्योग करायचा झाल्यास पालिकेच्या इमारत व कारखाने खात्याची ४६ परवानग्या घ्याव्या लागत. यापैकी २७ बाबतींत इतर विभागांद्वारेदेखील परवानग्या दिल्या जातात, तर काही बाबतींत राज्य किंवा केंद्र सरकारच्या खात्याद्वारेदेखील परवानग्या दिल्या जातात. त्यामुळे अत्यावश्यक नसेल तर परवानग्यांची पुनरावृत्ती टाळली जावी यासाठी महापालिका प्रशासनाने ‘इमारत व कारखाने’ खात्याशी संबंधित २७ परवानग्या रद्द करण्याबाबतची कार्यवाही केली.
“इझ ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांशी संबंधित विविध परवानग्या, संबंधित अर्ज मसुदे, प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत आता “इमारत व कारखाने’ खात्याशी संबंधित विविध ४६ परवानग्यांपैकी २७ परवानग्या रद्द करण्यात आल्याने उद्योजक, किरकोळ दुकानदार आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांचा उपक्रम
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. परवानग्या कमी करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा खास उपक्रम मानला जातो. पालिका प्रशासनाकरवी या निर्णयाची अंमलबजावणी करून भाजपने पालिकेतील मोठा भाऊ शिवसेनेला मोठी धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ महापालिका निवडणुकीत भाजपला मिळण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...