आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RJ मलिष्काला BMC ची नोटीस, रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची सेनेची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ हे आरजे मलिष्‍काचे गाणे शिवसेनेच्‍या चांगलेच जिव्‍हारी लागल्‍याचे दिसत आहे. या गाण्‍यामध्‍ये मुंबईतील रस्‍त्‍यावरील खड्डे, ट्राफीक जाम, लोकल ट्रेनमुळे सामान्‍यांना होणारा त्रास यावरुन आरजे मलिष्‍काने मुंबई महापालिकेची खिल्‍ली उडवली होती.   
 
या गाण्‍यानंतर जागृत मुंबई महापालिकेने स्‍वच्‍छतेची मोहिम गांभीर्याने घेतल्‍याचे दिसत आहे. पालिका अधिका-यांनी वांद्रे पश्चिममधील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्‍ये स्‍वच्‍छतेची पाहणी केली. यावेळी त्‍यांना एका घरामध्‍ये डेंग्‍युच्‍या अळ्या आढळल्‍या, असा दावा त्‍यांनी केला आहे. हे घर आरजे मलिष्‍काचे आहे. नंतर याप्रकरणी मलिष्‍काला ताबडतोब नोटीस बजावण्‍याची तत्‍परताही मुंबई महापालिकेनी दाखविली.  
 
 
500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 
‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ हे गाणे गाणाऱ्या आरजेच्‍या बुध्‍दीची किव करावीशी वाटते, अशी टीका करत शिवसेनेच्‍या नगरसेवकांनी गाणे प्रसारीत करणा-या रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्‍याची मागणी केली आहे.
 
मंगळवारी शिवसनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्‍त अजॉय मेहता यांची भेट घेतली. मुंबई महापालकेची बदनामी केल्‍याप्रकरणी रेडिओ चॅनलवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी त्‍यांनी आयुक्‍तांकडे केली आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा...मुंबई मला तुझ्यावर भरोसा आहे, आरजे मलिष्‍काच ट्विट 
 
बातम्या आणखी आहेत...