आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- मुंबईतील 1982 च्या संपामध्ये अनेक कापडगिरण्या बंद पडल्या. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) नवे तंत्रज्ञान आणून गिरणी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला ; परंतु गिरणीचा भोंगा पुन्हा वाजला नाही. बृहन्मुंबई पालिकेने मात्र हे आव्हान स्वीकारले असून कापड गिरणींचा भोंगा आणि धडधड मुंबापुरीत सुरू होणार आहे. पालिकेच्या वतीने गिरणगावात लवकरच जगप्रसिद्ध असे ‘कापड गिरणी वस्तुसंग्रहालय’ निर्माण करण्यात येणार आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपामध्ये अनेक कापड गिरण्या बंद पडल्या. या गिरण्यांमधील दोन लाखाच्या आसपास कामगार देशोधडीस लागले. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर आता कामागारांसाठी घरे उभरण्यात येत आहेत; परंतु गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांच्या घरांचे घोंगडे
भिजत पडले आहे.
मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीची मालकी राष्टÑीय वस्त्रोद्योग मंडळाकडे आहे. त्यातील काही जमीन कामगारांच्या घरांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिकेस त्यातील 60 हजार चौ. फू. इतकी जमीन मिळणार आहे. महापालिकेकडून या जमिनीचा वापर खुल्या मैदानासाठी करण्यात येणार आहे. त्याबरोबरच बंद गिरण्यांच्या जमिनीवर महापालिकेच्या वतीने भव्य असे ‘कापड गिरणी वस्तुसंग्रहालय’ निर्माण करण्यात येणार आहे.
या प्रस्तावित कापड गिरणी वस्तुसंग्रहालयात कापूस ते कापडापर्यंतचा इतिहास जिवंत उभा करण्यात येणार आहे. मुंबईची खरी ओळख गिरणगाव अशीच आहे. या शहराचा पाया ब्रिटीशांनी घातला असला तरी मुंबापुरीचा विकास इथल्या श्रमीकांनी केला आहे. त्या लाखों अनाम गिरणी कामगारांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठीच पालिकेकडून या वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.