आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई कोणाची.. महापौरपदासाठी भाजप नेतृत्व आक्रमक, अशी राहू शकतात पुढील समिकरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (84) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने 82 जागांवर कमळ फुलवले आहे. महापालिकेत युती तोडल्यानंतर भाजपने प्रथमच एवढ्या जागा पटकावल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपला 32 जागा मिलाल्या होत्या. 32 वरुन थेट 81 जागांवर त्यांनी हनुमान उडी घेतली आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी हे यश मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास असल्याचे म्हटले आहे. भाजपने पारदर्शकतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली  असली तरी त्यांनी शिवसेनेकडे 115 जागांची मागणी केली होती आणि सेनेने 60 जागा देण्याची तयारी दाखवली होती. त्यावरुन युती तुटली होती. निवडणुक निकालानंतर माध्यमांसमोर आलेल्या आशीष शेलारांनी सेनेवर निशाणा साधला. त्यासोबतच 4 अपक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगत भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. विधानसभेतही हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले  आणि निकालानंतर एकत्र आले होते. आता पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येतात का याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
 
मुंबई महापौरपदासाठी भाजप नेतृत्व आक्रमक 
- मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर झाला पाहिजे यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आक्रमक असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी भाजपने शक्यते सर्व ते प्रयत्न करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे समजते.
- भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत प्राथमिक बोलणीही सुरु केली आहे. त्यांना 7 जागा मिळाल्या असून राज ठाकरेही भाजपला साथ देणार असल्याचे समजते आहे.
- दुसरीकडे, बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी अलिप्त राहाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 
 
मुंबई महापौरपदासाठी काय असतील गणिते
पर्याय १ : महापाैरपद मिळविण्यासाठी ११४ जागांची गरज. शिवसेनेकडे ८४ जागा, बहुमतासाठी अाणखी ३० जागांची गरज. ८२ जागा मिळवणाऱ्या भाजपशी युती करून अडीच- अडीच वर्षे महापाैरपद घेणे.
 
पर्याय दाेन : भाजपची साथ नकाे असेल तर काँग्रेस (३१) आणि काही अपक्षांचा अातून किंवा बाहेरून पाठिंबा घेऊन शिवसेना महापौर बनवू शकते. 
 
पर्याय तीन : दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला (८२ जागा) काही अपक्ष, मनसे व काँग्रेसची साथ घेऊन सत्ता प्राप्त करता येईल.

नवे काय झाले
- मुंबई : एकाही पक्षाला बहुमत नाही. 
- नाशिक : मनसेच्या हातातून सत्ता भाजपकडे 
-सोलापूर : काँग्रेसचा पारंपरिक गड प्रथमच भाजपच्या ताब्यात 
 - नागपूर, अकोला, अमरावती : भाजपने सत्ता राखली, जागा लक्षणीय वाढल्या
 - पुणे, पिंपरी- चिंचवड, उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपची सरशी.
 
अशी असू शकतील समीकरणे
 
#1 शिवसेना-भाजप पुन्हा युती (84+81=165)
शिवसेना-भाजप हे दोन पक्ष एकत्र आले तर स्पष्ट बहुमताची सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्यात सत्तेच्या वाटाघाटी कशा होणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यावरून आणखी ताणाताणीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण भाजपच्या काही नेत्यांनी प्रचार संपल्यापासूनच सामंजस्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे हा पर्याय अस्तित्वात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

#2 काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा (84+31=115)
मुंबईत आम्ही किंगमेकर असू असा दावा मनसेने केला होता मात्र ती टोपीही काँग्रेसच्या डोक्यावर गेली आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला तर शिवसेनेला मॅजिक फिगर गाठण्यात यश येऊ शकते. पण भाजपने वारंवार काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे विश्वासार्हता टिकवण्यासाठी शिवसेना पाठिंबा घेणार की नाही, हे पाहावे लागेल. परंतू 'शिवसेना मोठी करायची असेल तर पुन्हा युती नाही' असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे या परिस्थितीत शिवसेना या पर्यायाचा अधिक गांभीर्याने विचार करण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. 
 
UPDATE
- वॉर्ड क्रमांक 220 मधून भाजप इश्वर चिठ्ठीने विजयी. येथे शिवसेना आणि भाजप यांच्यात टाय झाले होते. लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढून विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. यात भाजपचे अतुल शहा निशबवान ठरले. त्याआधी दोनवेला रिकाऊंटिंग झाले होते. या एका जागेसह भाजप 82 वर पोहोचली. तर सेना 84 वर कायम राहिली.  
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
- भाजपला मुंबईत 25 वर्षे आम्हीच रुजवले आहे. त्यांना संपवायला आणखी काही दिवस लागतील.
- मुंबईत सर्वात मोठा पक्ष शिवसेना असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. गुरुवारी सायंकाळी ठाकरेंनी पत्रकारांची भेट घेतली. 
- ते म्हणाले, एकीकडे साधन संपत्ती आणि सत्ता होती तर दुसरीकडे शिवसेना. सेनेने एक हाती हे यश मिळविल्याचे उद्धव यांनी म्हटले.
- मुस्लिम मतदानही काही प्रमाणात शिवसेनेकडे वळले आहे. बेहरामपाड्यातही शिवसेना जिंकली आहे. 
ज्यांनी भाजपविरोधात मतदान केले ते नोटबंदीविरोधातच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 
- मतदार याद्यांमधील घोळ हा मतदारांना त्यांच्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवणारा आहे. निवडणुक आयोगाला त्याचा जाब विचारला गेला पाहिजे.
- मतदार याद्यांमध्ये घोळ हे मोठे षडयंत्र होते. त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. 
- त्यांनी सत्ता, संपत्तीचा जो जोर लावला होता. त्याचा हा विजय आहे. 
- संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला. पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. 
- काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी परभावाची जबाबदारी स्वीकारत मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. 
- निरुपम म्हणाले, 'काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी आधी प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यांनी संजय निरुपमला पराभूत करण्याच्या नादात काँग्रेसला पराभूत केले आहे.'
- 'एक व्यक्ती मुंबईमध्ये विजय मिळवून देऊ शकत नाही. येथील नेत्यांनी अंग काढून घेतले होते.'
- निरुपम म्हणाले, 'दोन वर्षांपासून मी मुंबई अध्यक्षम्हणून काम करत होतो. माझ्याकडून काही चुकत असेल तर वरिष्ठांनी सांगायला पाहिजे होते. पक्षश्रेष्ठींकडे माझी तक्रार करायची होती.'
- कोणाचेही नाव न घेता निरुपम म्हणाले, 'नेतेच पक्षाला हारवण्यासाठी काम करत होते. वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी वक्तव्य होत होती. ट्विटरवरुन बोलले जात होते.' त्यांचा रोख गुरुदास कामत यांच्याकडे होता.
- काँग्रेसचे नेते नारायण राणे, मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंह, नसिम खान असे कोणीच या निवडणुकीत दिसले नाही. 
- भाजप नेते आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार पराभूत झाले आहे.
- मुंबई वॉर्ड क्रमांक 144 मधून भाजपच्या अनिता पांचाळ विजयी. त्यांनी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळेंचा पराभव केला.
- मुंबई महापालिकेतील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा घाटकोपरमधून विजयी. 
- भाजप उमेदवार पराग शहा यांनी 600 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
- मुंबई वॉर्ड क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या तेजस्वीनी घोसाळकर विजयी. 
- सत्तेचा राजदंड आमच्या हातात राहाणार असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 
- मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार आहे. गुजराती बहुल 42 पैकी 25 वॉर्डात भाजप आघाडीवर आहे. 
 
- दादरमधील 6 जागानंतर वरळीमधील 7 पैकी 6 जागांवर शिवसेना आघाडीवर. 
- दादर हा गड शिवसेना पुन्हा मिळवताना दिसत आहे. 
- दादरमध्ये शिवसेना 6 जागांवार आघाडीवर, भाजप 2 तर मनसे अवघ्या एका जागेवर आघाडीवर.
- उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा मिळविल्या आहेत. 
- ठाण्यातून प्रभाग 29 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी पाटील विजयी.
- वॉर्ड क्रमांक 108 मधून भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आघाडीवर.
- मुंबईचा पहिला कौल भाजपच्या बाजूने. वॉर्ड क्रमांक 218 मधून भाजप उमेदवार आघाडीवर. 
- पहिला निकाल 11 वाजतापर्यंत येण्याची शक्यता आहे. 
- शिवसेनेने 110 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 
- येथे प्रथमच भाजप 227 जागा लढत आहे. याआधी त्यांनी कधीच एवढ्या जागा लढविलेल्या नाहीत.
- 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपचे 15 आमदार मुंबईतून विजयी झाले होते. त्यामुळे आमची ताकद वाढल्याचा दावा भाजपने केला होता. 
- तर शिवसेनेने 25 वर्षे युतीत सडल्याचे सांगत स्वबळावर ठासून जिंकणार असल्याचे म्हटले होते. 
 
मुंबईकरांचा निकाल
मुंबई महापालिका शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे एमआयएम इतर 
227 84 82 31 09 07 03 11

मुंबई महापालिकेतील विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक -  विजयी उमेदवार -  पक्ष 
1     - तेजस्वीनी घोसाळकर   -  शिवसेना 
60    -  योगराज दाभोळकर    -  भाजप 
88    -  सदानंद परब       -  शिवसेना 
106     - नील सोमय्या     - भाजप 
109   -  दीपाली गोसावी    -  शिवसेना 
110    -  आशा कोपरकर     - काँग्रेस 
113    -  दीपमाला बढे        - शिवसेना 
114     - मिलिंद कोरगावकर   - भाजप 
123     - स्नेहल मोरे        -  अपक्ष 
126     - अर्चना भालेराव     - मनसे 
132     - पराग शहा      -    भाजप 
144    -  अनिता पांचाळ   -  भाजप 
182     - मिलिंद वैद्य     -    शिवसेना 
183     - गंगा कुणाल माने  -   काँग्रेस
184     - बाबू खान      -   काँग्रेस 
185     - जगदीश शैईवालापिल  -   शिवसेना 
186     - वसंत नकाशे      -   शिवसेना 
187     - मारीअम्मल थेवर   -  शिवसेना 
188     - शेख शहनाज हुसैन  -   शिवसेना 
189     - हर्षला मोरे        -  मनसे 
190     - शीतल देसाई     -    भाजप 
 
ठाणे महापालिकेत शिवसेनेला स्पष्ट बहुमत, राष्ट्रवादी क्रमांक दोनवर
ठाणे महापालिका शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे इतर अपक्ष
131 66 21 03 31 00 03 00
 
उल्हासनगर महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची भूमिका महत्तवाची ठरणार आहे. 
उल्हासनगर महानगरपालिका शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे अपक्ष इतर
78 25 32 01 04 00 00 16

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...