आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तरुणींच्या हत्येचे सत्र, ऑगस्ट महिन्यात सापडले चार मृतदेह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या विविध भागात गळा चिरुन तरुणींची हत्या केल्याची चार प्रकरणे समोर आली आहेत. यात अद्याप एकालाही अटक झालेली नाही. मृत महिलांची ओळखही पटलेली नाही. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातवरण आहे. शनिवारी सांताक्रूझ येथील रहेजा महाविद्यालयाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारे महिलेचा मृतदेह सापडण्याची ही चौथी घटना आहे.
दरम्यान, शनिवारी माहिम रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन जवळ तीन मृतदेह आढळले आहेत. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. तिघांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट झालेले नाही. तीनही मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहेत.
शुक्रवारी मलाड मालवणी येथील कारगिलनगरजवळच्या झुडपात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या तरुणीच्या गळ्यावरही धारदार शस्त्राचे वार होते. मलाडमधीलच कुरार परिसरातील एका पडिक इमारतीत ९ ऑगस्टरोजी एका महिलेचे प्रेत गोणीत बांधून ठेवलेले आढळले होते. त्याआधी ३ ऑगस्टला मीरा रोड स्टेशनजवळील खाडीत एका महिलेचे प्रेत सापडले होते. या सर्व महिलांची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या गुन्हात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मृतांचीही ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळालेली नाही.
या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे.
अपघाताची पाहाणी करण्यास गेलेल्या पोलिसांच्या गाडीला धडक
वकील महिलेची हत्या करणारा वॉचमन गजाआड, कारण अस्पष्टच
महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 50 हजार मुलींची हत्या - अ‍ॅड. वर्षा देशपांडे
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या ; पतीला जन्मठेप
गरोदर पत्नीची हत्या करून मुंबईत पतीचीही आत्महत्या