आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४५ स्थानकांत स्वच्छतेची निरंकारी मंडळाची मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चहुबाजूला कचरा, पानाच्या पिचकाऱ्या, सिगारेटची थोटके, कोळीष्टके असे दृश्य देशातील बहुतांश रेल्वे स्थानकात पाहायला मिळते. परंतु यातील ४५ निवडक रेल्वे स्थानके स्वच्छ करण्याचा विडा संत निरंकारी मंडळाने उचलला आहे. महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मंडळाचे हजार स्वयंसेवक या कामी झटत आहेत. कोणताही गाजावाजा करता महिन्यांपासून हा नेम सुरू आहे.
स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने नागरिकांना केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून आम्ही देशातील ४५ स्थानके निवडली आणि तेथे काम करतो, असे मंडळाचे प्रवक्ते प्रवीण छाब्रा यांनी सांगितले. या स्थानकांत राज्यातील दादर, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, पुणे, कोल्हापूर ही रेल्वे स्थानके आहेत. तर देशभरात अलाहाबाद, दिल्ली, भोपाळ, नवी दिल्ली, वाराणसी, डेहराडून, हरिद्वार, ग्वाल्हेर, जयपूर, सुरत, इंदूर, जबलपूर आदी रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वयंसेवी वृत्तीने घेतली आहे, असे छाब्रा म्हणाले. सकाळी वाजेपासून तास ही स्वच्छता मोहीम चालते.
शाळकरी मुले, काॅलेज तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक, स्त्री-पुरुष स्वयंसेवक अाहेत. पूर्णवेळ कार्यकर्ता कोणीही नाही.
झाडू, कपडा, साबण स्वखर्चाने आणतात. दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई सेंट्रल येथे ४५०० स्वयंसेवक श्रमदान करतात
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी वाजता स्वयंसेवक ठरलेल्या स्थानकात येऊन चार तास स्वच्छता करतात.
{ मंडळ १९८६ पासून देशात रक्तदान शिबीरे घेते.
{ ‘रेडक्रॉस’ने गौरविलेल्या या मंडळाने नुसत्या मुंबईमध्ये २० हजारांवर रक्तदाते जोडले अाहेत.
{ विलेपार्ले येथे २६ जानेवारीला मंडळाने रक्तपेढी सुरू केली. सुमारे ५०० बॅग रक्ताची सोय आहे. १९८८पासून देशभरात आरोग्य शिबिरे घेतली जातात.
{ पोलिओचे रुग्ण, क्षयरोगी, मोतिबिंदूचे शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी सरकारी रुग्णालयांशी डॉक्टर संस्थेचे स्वयंसेवक यांची मदत होते.
{ कोलकाता चेन्नई, दिल्ली, अलाहाबाद येथे संस्थेची रुग्णालये असून सुमारे २०० धर्मादाय दवाखाने भारतभर आहेत. दरवर्षी दोन लाख लोक याचा फायदा घेत आहेत.
संत निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक मुंबई स्थानकावर स्वच्छता करताना.