आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरीमध्‍ये 3 खोल्यांत चालते झाकीरचे ऑफिस; बाहेर पोलिस, आत वर्ग सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईच्या मीरा - भाईंदरमधील डोंगरी परिसर. अंधाऱ्या गल्ल्या, अरुंद रस्ते, दाट वस्तीचा हा परिसर कधीकाळी अंडरवर्ल्डचा गड होता. हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अरुण गवळी हे डॉन येथूनच नावारूपाला आले, मोठे झाले, जगभर बदनाम झाले व शेवटी डोंगरीपासून दुबईपर्यंत पोहोचले.

याच डोंगरी भागातील एसव्हीपी रोड हा डॉ. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (अायआरएफ) पत्ता आहे. बांगला देशात ढाक्यातील दहशतवादी हल्लेखोरांनी त्यांचे प्रेरणास्त्रोत डॉ. झाकीर नाईक असल्याचे सांगितल्याने तो चर्चेत आला आहे. त्याच्याबाबत फाउंडेशनमधील कुणीही काहीही सांगण्यास तयार नाही. शेवटी आम्हीच इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा शोध घेत डोंगरीत पोहोचलो. मुख्य रस्त्यावर एक जुनी इमारत आहे. त्याच्या तीन खोल्यांवर इस्माम शिकवणाऱ्या क्लासचा इंग्रजी बोर्ड लागलेला आहे. दरवाजा बंद आहे. बाहेर चार खुर्च्या ठेवलेल्या असून एक पोलिस बसला आहे. मी दरवाजा उघडण्यासाठी हात पुढेग करताच दुसऱ्या खुर्चीवरील एका व्यक्तीने मला अडवले.”आज ऑफिस बंद आहे.’ त्यानंतर मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर त्याचे एकच उत्तर होते “आम्हाला कल्पना नाही.’
तेथेच उभे राहून ऑफिसच्या लँडलाइनवर फोन केला तेव्हा कळले की आत आॅफिसचे काम सुरू आहे. परंतु त्यांचे पीआरओ/ प्रशासकीय व्यवस्थापक मंजूर शेख आजारी आहेत. त्यांचा दुसरा नंबर कार्यालयातून दिला जाऊ शकत नाही. तेथे बसलेल्या पोलिसानेही काहीही सांगण्यास नकार दिला. त्यांना तुम्ही इथे किती दिवसांपासून आहात? असे विचारले. उत्तर मिळाले, आम्हाला इथे चेन स्नॅचिंगच्या घटना राेखण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. परंतु काही वेळातच त्यांनी सांगितलेल्या कारणाचा भंडाफोड झाला. त्यांच्या एक वरिष्ठाने तेथे येऊन कार्यालय आज सुरू आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा शिपाई त्यांना म्हणाला, “सर गप्प बसा, मीडियावाले आले आहेत.’ झाकीरसाठी सोशल मीडियावर फॅन ग्रुप चालवणारे मोहसिन सांगतात की, आयआरएफच्या खात्यातून ५० लोकांना वेतनही मिळते. डॉ. झाकीर नाईकशिवाय त्याचा भाऊ मोहम्मद नाईक, पत्नी फरहत नाईक ही देखील फाउंडेशनमध्ये सामील आहेत. पत्नी फरहत महिलांना इस्लाम शिकवते. (क्रमशः वाचा पुढील स्‍लाइड्सवर..)
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ऑफिसच्‍या बाहेर असे असते वातावरण.. वाचा, झाकीर नाईकने कसे सुरू केले इस्लामिक स्कुल.. आतापर्यंत किती झाले भाषणे.. जगभरात किती कोटी आहेत दर्शक.. व इतर बाबी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...