आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai People Got Currency Behind The Sea At Gate Way Of India

PHOTOS: मुंबईच्या समुद्रातून वाहत येताहेत हजाराच्या नोटा, गोळा करण्यासाठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या समुद्रातून हजाराच्या नोटा वाहत येत आहेत. या नोटा गोळा करण्यासाठी शेकडो लोक समुद्र किनारी जात आहेत. काल सायंकाळपर्यंत लोकांनी सुमारे तीन लाख रुपये अशा प्रकारे गोळा केल्याचे समजते. समुद्रातून नोटा काढण्यासाठी लोक अगदी जीवही धोक्यात टाकताना दिसून येत आहेत.
गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्रात नोटा वाहून येत असल्याची बातमी काल दिवसभर मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर येथील वस्त्यांमधील लोक मोठ्या संख्येने समुद्र किनारी जमा झाले. यावेळी सगळेच समुद्रातून नोटा काढताना दिसत होते. या हजाराच्या नोटा असल्याने लोकांना मोह आवरता आवरेना. परंतु, या दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर काही पोलिस येथे तैनात करण्यात आले.
समुद्रातून वाहत आलेल्या नोटा बनावट असल्याचेही सांगितले जात आहे. बनावट नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून अशा प्रकारचे प्रयत्न करण्यात येतात. पण काही लोक सांगतात, की या नोटा खऱ्या आहेत. त्यामुळे नोटा खऱ्या की बनावट हे एक मोठे प्रश्नचिन्हच आहे. शिवाय त्या या समुद्रात कशा आल्या हेही कोडेच आहे.
पुढील स्लाईडवर बघा, लोकांनी कशा गोळा केल्या नोटा... असा जीव टाकला धोक्यात...