आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने दाखवले ट्रान्सजेंडर कपलचे लव्ह मोमेंट्स, पाहा लग्नानंतरचे LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनु पटनायकने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचा पती जय शर्मा यांचे लव्ह मोमेंट्स कॅमे-यात कैद केले आहे. - Divya Marathi
अनु पटनायकने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचा पती जय शर्मा यांचे लव्ह मोमेंट्स कॅमे-यात कैद केले आहे.
मुंबई- महाराष्ट्रातील तृतीयपंथियांची मतदारांची संख्या गेल्या काही दिवसात दुप्पट वाढली आहे. राज्यात सध्या 1645 तृतीयपंथीय मतदार आहेत. तर, 2014 मध्ये केवळ 918 तृतीयपंथीय मतदार होते. देशातील आणखी एक एलजीबीटी कम्युनिटी समाजाच्या बरोबरीच्या दर्जासाठी लढत आहेत. मुंबईचा फोटोग्राफर अनु पटनायकने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचा पती जय शर्मा यांचे लव्ह मोमेंट्स कॅमे-यात कैद केले. माधुरी आणि जय असे पहिले कपल आहे, ज्यांनी खुलून सांगितले की, दोघांपैकी एक जण ट्रान्सजेंडर आहे. कपलसोबत घालवले काही दिवस...
 
- एका वेब पोर्टलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये अनुने सांगितले की, जेव्हा या कपलला पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत काही काळ घालवला पाहिजे असे मला वाटले. 
- मला त्यांच्या जीवनातील छोटे मोठे क्षण कसे घालवितात ते टिपायचे होते. मला त्यातून दाखवायचे होते प्रेमात जेंडर असे काहीही नसते. 
- या कपलकडून खासकरून माधुरीकडून काही आपण शिकू शकतो. माधुरी एक ट्रान्सजेंडर मॅरेज सर्टिफिकेट घेण्यासाठी लढाई लढत आहे.
 
फेसबुकवर झाली होती भेट-
 
- जय आणि माधुरी यांची भेट फेसबुकवर झाली होती. दोन वर्षानंतर दोघांनी हिंदू रिती-रिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- या दरम्यान सुप्रीम कोर्ट द्वारा ट्रान्सजेंडरला तिसरे जेंडर देण्याचा निर्णय आला आहे. मात्र, त्यात लग्नाबाबत काही उल्लेख नाही. 
- माधुरीच्या माहितीनुसार, आम्ही दोघे मागील पाच वर्षापासून एकत्र राहत आहे. आमच्या लग्नाला कायद्यानुसार मान्यता मिळाली पाहिजे. मात्र ही एक अवघड प्रक्रिया आहे. 
- माधुरी सांगते की, मी ट्रान्सजेंडर मॅरेज सर्टिफिकेट घेऊनच राहीन. त्यासाठी भले मला कोर्टात जाण्याची का वेळ येईना.
 
कोण आहे अनु पटनायक?
 
- अनु पटनायक एक फ्री लान्स फोटोग्राफर आहे. सध्या ती मुंबईत राहते.
- ती अनेक बॉलिवूड मूव्हीजमध्ये स्टील फोटोग्राफी टीमची सदस्य राहिली आहे.
 
(नोट: सर्व फोटोज अनु पटनायकच्या परवानगीने वापरत आहोत.) 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रान्सजेंडर कपलचे लव्ह मोमेंटसचे फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...