मुंबई- गोव्यातून आलेल्या एका लक्झरी वॉल्हवो बसमध्ये बेकायदेशीरपणे मुंबईत आणलेले 68 लाखांच्या परकीय चलनासह विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. यात 13 देशातील वेगवेगळ्या चलनाचा समावेश आहे. अमेरिकन डॉलर, ब्रिटनचे पौंड आणि जर्मन देशाच्या चलनाचा यात समावेश आहे. मुंबई पोलिसांनी सोलापूर स्ट्रीटवरील दाना परिसरात ही कारवाई केली.
बसचालकाकडे चौकशी करत असतानाच तो तेथून फरार झाला. त्यानंतर मुंबईतील एकाला याप्रकरणी अटक केली आहे. हे परकीय चलन पाठवणा-या गोव्यात असणा-या दोघांना मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती पुढे आलेली नाही.