आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबू सालेमला भेटायला आलेल्या दोन हस्तकांना अटक, पोलिसांना दमदाटी करत धमकावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेलमधून कोर्टात सुनावणीला हजर करताना अबू सालेम आपल्या हस्तकांना भेटायचा. - Divya Marathi
जेलमधून कोर्टात सुनावणीला हजर करताना अबू सालेम आपल्या हस्तकांना भेटायचा.

मुंबई- मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी व डॉन अबू सालेमला भेटायला गेलेल्या हस्तकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली. सालेमला सुरक्षा कवच असतानाही त्याचे दोन हस्तक त्याला भेटण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचलेच. त्यानंतर पोलिसांना दमदाटी केली व धमकावले. एका हस्तकाने तर पोलिसाचा हात पकडत खुलेआम परिणाम भोगायला तयार रहा अशी धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी दोन्हीही हस्तकांना अटक केली.

 

नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये हवा खात असलेल्या अबू सालेमला सोमवारी सीबीआय कोर्टात आणले होते. एसीपी विकासचंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, सीबीआय कोर्टात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली होती. सकाळी साडेआकराच्या सुमारास अबू सालेमला कोर्टात हजर करण्यात आले. या दरम्यान त्याला दोन तरूण सुरक्षा यंत्रणाला भेदून त्याला भेटायला पोहचले. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पोलिसांवरच दादागिरी करू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि कोतवाली पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या दोघांची ओळख काढण्याचा प्रयत्न केला ते दोघेही यूपीतील आझमगडमधील सरायमीरचे रहिवासी असल्याचे समोर आले. मोहम्मद सालिक आणि मोहम्मद आरिफ अशी त्यांची नावे समोर आली. या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तरूणाने सांगितले, मी सालेमचा नातेवाईक-

 

अबू सालेमला कोर्टात हजर करण्यावेळी भेटण्याचा प्रयत्न करणारे सालिक व आरिफ त्याचे नातेवाईक आहेत. सीओ केसरबाग अमित राय यांनी सांगितले की, सालिक सालेमची बहिण अंजुमचा मुलगा आहे तर आरिफ पुतण्या आहे. जेव्हा या दोघांना सालेमला भेटण्याचे कारण काय असे विचारले तर त्यांनीही काहीही सांगितले नाही. तसेच दोघांनी नंतर वेगवेगळी कारणे दिली. ज्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय आणखी वाढला.

 

कोर्टातील सुनावणीदरम्यान हस्तकांना द्यायचा आदेश- 

 

जेलमधून कोर्टात सुनावणीला हजर करताना अबू सालेम आपल्या हस्तकांना भेटायचा. एसीपी (पश्चिम) विकास चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, अशी अनेकदा माहिती मिळाली होती. त्यामुळे सोमवारी विशेष सुरक्षा व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. सोबत साध्या कपड्यात पोलिस तैनात करण्यात आले होते. ज्यामुळे सालेमला भेटायला आलेल्या त्याच्या दोन हस्तकांना पकडण्यात यश आले. बोलले जाते की, जेलमधून कोर्टात जाताना सालेम अनेक व्यापा-यांना फोन करूव खंडणी मागतो.

 

वसुली करतात हस्तक-

 

अबू सालेमला यापूर्वी जेव्हा कोर्टात हजर करण्यात आले होते तेव्हा हा खुलासा झाला होता की, त्याच्या नावावर त्याचे हस्तक वसुली करत आहेत. सालेमच्या भीतीने पीडित लोक एफआयआर दाखल करत नव्हते. सालेमच्या हस्तकाची दादगिरी सोमवारी पाहायला मिळाली. पोलिसांनी तुम्हाला बघून घेईन आणि परिणाम भोगायला तयार अशी धमकी दिली. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती...

बातम्या आणखी आहेत...