आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Arrest One Youth Who Called & Sms To Some Actress\'s

अभिनेत्रींना रात्री-अपरात्री अश्लिल एसएमएस, फोन करणा-या तरुणाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री-तारकांना रात्री-अपरात्री फोन व एसएमएस करून अश्लिल संभाषण करणा-या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. हरिश भट असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकमधील आहे.
हरिश भट हा बॉलिवू़डमधील सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींना व प्रसिद्ध महिलांना रात्री एसएमएस करायचा. मात्र, त्याकडे या मंडळींनी फारसे लक्ष न देता दुर्लक्ष केले. मात्र, यामुळेच त्याचे फावले. हळू-हळू एसएमएसनंतर तो फोन करून माझा एसएमएस मिळाला का, रिप्लाय करता आला नाही व बिझी होता काय असे प्रश्न विचारून मला तुम्हाला भेटायचे आहे. काही माहिती सांगायची असून महत्त्वाचे बोलायचे आहे, असे लखोबा स्टाईल बाता मारत अश्लिल बोलत बसायचा. मात्र, हा प्रकार रोजच होऊ लागला. कित्येकांनी एसएमएस पाहणे व सोडून देणे असे ठरवले होते. मात्र, एका उद्योजक महिलेने व अभिनेत्रींने रोजच त्रास होऊ लागल्याने पोलिस ठाणे गाठले.
आणखी वाचा पुढे, जा तुम्ही काय करायचे ते करा, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही...