आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर बाहुबली, अमिताभचे रंजक संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘किसी भी अनजान को। तू ना दे ओटीपी कभी। या फिर पासवर्ड सभी। कर शपथ। कर शपथ। अग्निपथ...’ ‘हिट अँड रन तो केवल क्रिकेट में ही उचित है। जीवन कोई खेल नहीं है, इसे सम्मान देंं।’ अशा रंजक ओळी मुंबई पोलिस लोकांना जागरूक करण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट करतात.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांच्या पोलिसांचे ट्विटर हँडल पाहिले असता, रंजक ट्विट करण्यात मुंबई पोलिस सर्वात आघाडीवर आहेत, असे दिसते. दिल्ली पोलिसांचे ट्विटर हँडल अत्यंत सामान्य आहे, त्यावर गुन्ह्यांची माहिती, जागरूक करणाऱ्या ओळी, तपासाची माहिती ही माहिती असते. याउलट मुंबई पोलिस आपल्या ट्विटर अकाउंटवर हीच माहिती रंजक पद्धतीने देतात. त्यासाठी ते वन लायनर, फोटो, मेमेज यांचा वापर करतात. त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर ३० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिल्ली पोलिसांपेक्षा खूपच जास्त. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फक्त १ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत. मुंबई पोलिस तर डिसेंबर २०१५ मध्ये ट्विटरवर आले आहेत, याउलट दिल्ली पोलिस सप्टेंबर २०१३ पासून या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.  
 
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलच्या या यशाचे कारण म्हणजे त्यांच्या वेबसाइट डेव्हलपर सेंटरच्या चमूची महत्त्वाची भूमिका हे आहे. हा चमू काही सोशल मीडिया सल्लागारांसह २४ तास सावधपणे काम करतो. वेबसाइट डेव्हलपमेंट सेंटर टीमच्या सदस्य महिला पोलिस अधिकारी सारिका थोरात यांनी सांंगितले की, “ट्विटर हँडल चमूत एक अधिकारी आणि १६ इतर कर्मचारी आहेत. आम्ही सर्व जण तीन शिफ्टमध्ये दिवसरात्र काम करतो. आम्ही जे सामाजिक संदेश आणि जागरूकता पसरवणारे ट्विट तयार करतो, त्यात आवश्यक दुरुस्त्या आणि सुधारणा संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या स्तरावर होतात. त्यांची मंजुरी मिळाली की ट्विट केले जाते.” या कामात मुंबई पोलिस काही व्यावसायिक लोकांचीही मदत घेतात.

या व्यावसायिक लोकांत माजी पत्रकारांपासून ते आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश अाहे. हे लोक मुंबई पोलिसांना ग्राफिक्स, डिझाइन आणि मोहीम तयार करण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने मदत करतात. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटबाबत बोलताना डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या की,  “आमच्या ट्विटर हँडलवर फॉलोअर्सच्या संख्येत दररोज सुमारे १० हजारांची वाढ होत आहे. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींची जागरूकता मोहिमेतील भागीदारी खूपच परिणामकारक ठरत आहे. आम्ही ट्विटरवर आलेल्या सर्व तक्रारींची नोंद पूर्ण संवेदनशीलतेने घेतो, हेही मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलच्या लोकप्रियतेचे एक मुख्य कारण आहे.’

माजी पोलिस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, “माजी पोलिस आयुक्त जावेद अहमद आणि माझ्या कार्यकाळात मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल सुरू झाले. पण मुंबई पोलिस सोशल मीडियाच्या एखाद्या प्रभावशाली प्लॅटफॉर्मवर असावेत याचा पाया माजी आयुक्त राकेश मारिया यांच्या कार्यकाळात घातला गेला. मुंबई पोलिसांची स्वत:ची वेबसाइट खूप आधीपासूनच होती, पण तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर असायला हवे, अशी सूचना सर्वसामान्य लोकांनी मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर देणे सुरू केले.  गेल्या १४ जूनला मुंबई पोलिसांनी पावसाळ्यात वाहनांचे अपघात टाळण्यासाठी केलेले ट्विट असे : ‘हम सब जीवन में स्पेस चाहते हैं, ऐसा ही हमारी कारों के साथ भी होता है।’ काही दिवस बाहुबली २ च्या वेळी मुंबई पोलिसांनी दोन प्रश्न ट्विट केले- पहिला म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले आणि दुसरा म्हणजे लोक वाहतुकीचे नियम का पाळत नाहीत?
बातम्या आणखी आहेत...