आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Back To Police Security From Mla Ram Kadam

आमदार राम कदमांची सुरक्षा मुंबई पोलिसांनी काढली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वाहतूक पोलिस शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला मारहाणा केल्याप्रकरणी विधिमंडळातून निलंबित केलेले आमदार राम कदम यांची पोलिस सुरक्षा आज मुंबई पोलिसांनी काढून घेतली. एखाद्या आमदाराला निलंबित केल्यानंतर त्याची सुरक्षा काढण्याची तरतूद आहे याचा आधार घेत मुंबई पोलिसांनी कदमांशी पंगा घेतला आहे.

राम कदम यांच्या सुरक्षेसाठी सध्या चार पोलिस कार्यरत होते. मात्र त्यांना आता हटविण्यात येणार आहे. याचबरोबर या मारहाणीतील मुख्य आरोपी आमदार क्षितीज ठाकूर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. मात्र त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढण्याचा प्रश्नच नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात एकून पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच एपीआय सचिन सुर्यवंशी यांनाही लोकप्रतिनिधींशी अर्वाच्च्य भाषा वापरल्याबद्दल निलंबित केले आहे.