आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Beaten Young Girl At Lalbag Raja Ganpati

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी VIP रांगेत घुसलेल्या तरुणीला पोलिसांनी चोपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लालबागचा राजाच्या दर्शनासाठी व्हिआयपी रांगेत घुसलेल्या तरुणीला दर्शन महागात पडले आहे. मुंबई पोलिसांनी या तरुणीला चांगलाच चोप दिला. महिला पोलिस तरुणीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तरुणीला मारहाण केली त्यानंतर तिला काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि 1200 रुपये दंड वसुल करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी 48 तासांत रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे, की तरुणीला वारंवार नकार दिल्यानंतरही तिने व्हीआयपी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी निकार दिल्यानंतर तिने वाद घातला.

दोषींवर कडक कारवाई करणार
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी हे गंभीर प्रकरण असल्याचे सांगत पोलिसांना दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी याचा तपास करत असल्याचे ते म्हणाले. यात दोषी आढळलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही शिंदे म्हणाले.
मुंबई पोलिस सह आयुक्त देवेन भारती यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ क्लिप मागवून पोलिसांची ओळख पटवण्यात येत आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे भारती यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो