आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री- आरआर यांच्या \'गृह\'कलाहामुळे मुंबईला पोलिस आयुक्त मिळण्यास उशीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी राजीनामा देऊन 5 दिवस लोटले. सिंह यांनी मेरठमधील मोदींच्या जाहीर सभेत भाजपात प्रवेशही केला. मात्र राज्य सरकार अद्याप मुंबईसाठी नवा पोलिस आयुक्त देऊ शकलेला नाही. मुंबई शहर हे कायमच संवेदनशील राहिले असून, दहशतवाद्यांनी याला कायमच लक्ष्य केले आहे. अशा स्थितीत मुंबईला पोलिस आयुक्त मिळणार तरी कधी असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात वाद उदभवल्याने हा प्रश्न पुढील चार-पाच दिवस मिटण्याची सूतराम शक्यता नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये गेल्या अनेर महिन्यांपासून मुंबईचा पोलिस आयुक्त कोण असावा यावरून वाद आहेत. त्यातच आयपीएस अधिका-यांच्या बदल्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे व डीवायएसपी पातळीवरील अधिका-यांचे अधिकार गृहमंत्र्यांकडे असल्याने हा वाद आणखीच चिगळण्याची शक्यता आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांचे म्हणणे आहे की, गृहमंत्रालयाचा प्रमुख या नात्याने माझ्या खात्याशी संबंधित बदली करण्यापूर्वी माझ्याशी काही सल्लामसलत करणार आहात की नाही. जर तसे नसेल तर मला गृहमंत्रालय संभाळण्यात काडीचाही रस नाही. यासंदर्भातील वाद आधिच विकोपाला गेल्याने अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांच्याही गेल्या वर्षभरापासून बढत्या व बदल्या रखडल्या आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांत मुंबईसाठी नवा पोलिस आयुक्त नेमण्यासाठी निर्णय घेतला जाईल असे चार दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, अद्यापही कोणत्याही हालचाली सुरु नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री चव्हाण गेली दोन लोकसभेच्या जागांवाटपाच्या चर्चेत गुंतले आहेत. तर काल ते दिल्लीत होते. राष्ट्रवादीही संभाव्य आघाडी व जागावाटप यावरून त्रस्त आहे. त्यामुळे आरआर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांच्या नेमणूकीपेक्षा पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या बैठकीकडे व जागावाटपाकडे लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू असून, तो सध्या विकोपाला गेला असल्यानेच मुंबईसाठी नवा पोलिस आयुक्त नेमण्यासाठी आपल्याच गटाचा आयुक्त यावा यासाठी दोन्ही पक्षात चुरस लागली आहे, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिका-यांने माहिती दिली. आमच्या 25-30 वर्षांतील आयपीएस सेवेमध्ये बदल्या व बढत्यांसाठी इतका विलंब झालेला आम्ही कधी पाहिलेला नाही. जावेद अहमद, विजय कांबळे व राकेश मारिया या तीन आयपीएस अधिकार्‍यांमध्ये मुंबईच्या आयुक्तपदासाठी स्पर्धा आहे. मात्र, या तिघांनाही कोणाची वर्णी लागेल याची माहिती नाही.