आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा महाराष्ट्र पोलिसच्या ARNOLD ला, प्रत्येक जण फोटो काढण्यासाठी असतो अतूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक आरोग्य दिवस आहे. संपूर्ण जगामध्ये आज आरोग्यासंबंधी विविध प्रकारे जागरूकता करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे. याच दिवसाचे औचित्य साधून Divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे एका अशा महाराष्ट्र पोलिसाच्या एका अशा पोलिस कॉन्स्टेबलबद्दल, ज्याला बॉडी बिल्डींगची आवड आहे. बॉडी बिल्डींगच्या या त्यांच्या आवडीमुळे ते देशा-परदेशातपर्यंत गेले आहेत. महाराष्ट्र पोलिसकडून खेळताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये प्रथमस्थान पटकावले आहे.
आम्ही सांगत आहोत महाराष्ट्र पोलिसमधील कॉन्स्टेबल किशोर डांगे यांच्याविषयी. ते महाराष्ट्र पोलिसात 'अर्नाल्ड' नावाने प्रसिध्द आहेत. हे नाव त्यांना हे नाव बॉडी बिल्डींगसाठी मिळाले आहे. सध्या ते जालना जिल्ह्याच्या पोलिस फोर्स कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. ते त्यांच्या शहरात खुपच प्रसिध्द आहेत. जो कोणी त्यांना भेटतो तो त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याचा हट्ट धरतो.
पोलिसाची नोकरीसोबतच किशोर बॉडी बिल्डींगही करतात. यामुळे त्यांना देशा-परदेशात जाण्याची संधी तर मिळालीच सोबतच, तेथील स्पर्धांमधून त्यांनी अनेक पारितोषिकही पटकावले आहेत. मागीलवर्षई त्यांनी नॉर्थ आयर्लंडच्या बेलफास्ट येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.
गरीब कुटुंबात झाला जन्म
मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर मराठवाड़ा असे अनेक खिताब आपल्या नावावर केलेल्या किशोरने अनेक परदेशी स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावले आहेत. जालन्याच्या एका गरिब कुटुंबात जन्मलेल्या किशोरला पोलिसाची नोकरी अथक परिश्रमानंतर मिळाली आहे.
संसाधनांची कमी असताना त्यांनी हार मानली नाही. ते आज ज्या शिखरावर आहेत, त्यासाठी त्यांनी अभ्यासासोबतच बॉडी बिल्डींगवरही कठीण परिश्रम घेतले. आर्थिक विवंचना असताल्यामुळे त्यांना अनेकवेळा सराव सोडावा लागला. मात्र त्यांना पोलिसाची नोकरी लागल्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व लक्ष बॉडी बिल्डींगवरच केंद्रीत केले आणि त्यामुळे आज ते या शिखरावर आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, किशोर डांगे याचे इतर काही PHOTOS...