आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिली लाईटवेट बुलेट प्रूफ गाडी, ग्रेनेड हल्लाही ठरतो कुचकामी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई पोलिसांच्या फोर्स वन प्रमाणेच बिहार एटीएस (अँटी टेररिस्ट स्क्वॉयड) ने ही आपले कमांडो फोर्स तयार केले आहे. बिहार पोलिसांचे हे नविन कमांडो यूनिट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहार दौ-यात सुरक्षा देईल. 26/11 हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची फोर्स वन यूनिट देशातील असे पहिले यूनिट आहे, जे खासकरून महानगरातील शहरांत 15 मिनिटांच्या आत टेरर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची क्षमता आहे. फोर्स वन यूनिट आधुनिक शस्त्रे बुलेट प्रूफ गाडीसह वापर करते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, देशातील पहिली लाईटवेट (हलकी) बुलेट प्रूफ ( लोखंडी व स्टेनलेस स्टीलने बनवलेली कार) गाडी मार्क्समॅन हिच्याबाबत.... ज्या गाडीला मुंबई पोलिस फोर्स वनच्या माध्यमातून वापर केला जातो.
देशातील पहिली लाईटवेट बुलेट प्रूफ गाडी आहे मार्क्समॅन-
मार्क्समॅन ही गाडी महिंद्रा कंपनीने बनविली आहे. इतर बुलेट प्रूफ गाड्या प्रोटेक्शनसाठी वापरल्या जातात. मात्र, ही बुलेट प्रूफ गाडी दुस-यावर 'अटॅक' करण्यासाठी वापरली जाते व त्यासाठीच बनविली गेली आहे. या गाडीत बसून जवान कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांशी सहज लढू शकतात.
मार्क्समॅन ग्रेनेड आणि गोळ्यांचा मारा ठरवते कुचकामी-
या गाडीचे खास वैशिष्ट्ये हे आहे की, गाडी ग्रेनेड हल्ल्याला बळी पडत नाही. ग्रेनेड हल्ला, गोळीबार ही गाडी सहज झेलू शकते. या गाडीचे टायरही अशा पद्धतीचे बनविले आहेत की, गोळीबराने ते पंक्चर होत नाहीत.
सर्वप्रथम मुंबई पोलिसांकड़ून खरेदी-
सन 2009 मध्ये मुंबई पोलिसांनी आपल्या फोर्स वन यूनिटसाठी मार्क्समॅन गाडी खरेदी केली. आता बंगळुरु पोलिस, कोलकाता पोलिस समेत विदेशातील पोलिसांनीही ही गाडी खरेदी केली आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, बुलेटप्रूफ मार्क्समॅन गाडीचे PHOTOS...