आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील एका विहिरीतुन निघत आहे सोने, चांदी; स्थानिकांनाही माहिती नव्हती या खजिन्याची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरांनी सांगितल्यानंतर पोलिसांना विहिरीत हा खजाना सापडला आहे. - Divya Marathi
चोरांनी सांगितल्यानंतर पोलिसांना विहिरीत हा खजाना सापडला आहे.
मुंबई- कुरार या गावातील एका विहिरीतुन मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांची एक टीम 21 ऑक्टोबर रोजी एका दरोडयानंतर या भागातील विहिरीमध्ये याबाबत शोध घेत होती. जेव्हा याठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दागिने सापडले.
 
कशी माहिती झाली या दागिन्यांची
- मुंबईतील कुरार गावाच्या परिसरात 21 ऑक्टोबर रोजी एका मोबाईल दुकानात चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. जय कुमार, मनोज कुमार पटेल आणि अन्य एका आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
- पोलिसांना चौकशीत चोरट्यांनी या विहिरीबद्दल माहिती दिली होती. त्यांनी पोलिसांना सांगितले की ते चोरी केल्यानंतर दागिने एका विहिरीत लपवत होते.
- त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या विहिरीतील पाणी काढले. त्यानंतर काही लोकांनी विहिरीत उतरत या दागिन्यांचा शोध घेतला.
- काही वेळातच या विहिरीत अनेक पिशव्या सापडल्या. या पिशव्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने होते.
- पोलिसांनी सांगितले की पकडण्यात आलेल्या चोरट्यांवर यापुर्वीही दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे चोर दुकान आणि नागरिकांच्या घरांमध्ये चोरी केल्यानंतर दागिने थैलीत गुंडाळून ती थैली ते विहिरीत फेकत.
- स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अनेक वेळा येथे काही तरुण पोहण्यासाठी उतरत त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका आली नाही.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
  
बातम्या आणखी आहेत...