आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Gets Threatening Letter From \'Mujahideen\', City On Alert

\'गाझाचा बदला मुंबई\' पोलिस आयुक्तांना मिळाली चिठ्ठी; मुंबईत हाय अलर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईचे पोलिस अधिक्षक यांना 'गाझा का बदला मुंबई' अशा आशयाची चिठ्ठी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीमध्ये गाझाचा बदला मुंबईकडून घेणार अशी चेतावणी देण्यात आली आहे. चिठ्ठी मिळताच मुंबईमध्ये हाय अॅलर्टची घोषणा करण्यात आली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, ही चिठ्ठी मुंबईच्या पोलिस मुख्यालयात 25 जुलै रोजी पाठवण्यात आली होती. पोलिस अधिक्षकांना ही चिठ्ठी मुजाहिदीनच्या नावाने मिळाली आहे. यामुळे यापाठीमागे इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याची शंका व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युध्दात गाझामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
चिठ्ठीत लिहिले आहे की, "रोक सको तो रोक लो, हम बदला लेकर रहेंगे, 1993 में बच गए तो लेकिन अब नहीं बच पाओगे।" ही चिठ्ठी इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांना मिळून लिहिण्यात आली आहे. या संदर्भात राकेश मारिया म्हणाले की, "पोलिस या चिठ्ठीच्या विश्वासार्हतेचा तपास करत आहे, मात्र आम्ही या धमकीकडे दुर्लक्ष करत नाही. चिठ्ठी मिळताच आम्ही क्राईम ब्रांचसोबतच सर्वच पोलिस ठाण्यांवर याबद्दल माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या चिठ्ठीबद्दल दिल्ली पोलिसांना माहिती दिली आहे. राकेश मारिया यांनी 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा तपास केला असून त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
ईदच्या मुहुर्तावर सर्वत्र कडक सुरक्षा
चिठ्ठी मिळाल्यानंतर सर्वच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. तर काही दिवसांतच रमजान ईदचा सण असल्याने, पोलिसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत, सुरक्षा वाढवली आहे.
फोटो - फाईल फोटो