आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Gets Threatening Letter From 'Mujahideen', City On Alert

गाझातील हल्ल्यांचा बदला मुंबईत घेऊ, पोलिस आयुक्त मारियांना धमकीचे पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गाझापट्टीवर इस्रायलकडून होणाºया हल्ल्यांचा बदला मुंबईत घेऊ, अशी धमकी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना मिळालेल्या पत्रात देण्यात आली आहे. 1993 साली तुम्ही मुंबईला वाचवले, आता शक्य असेल तर वाचवून दाखवा, असे आव्हानही मुजाहिदीन या संघटनेने दिले आहे.
हे पत्र 25 जुलैला पोलिस नियंत्रण कक्षास मिळाल्याचे मारियांनी सांगितले. मुंबईतील 1993 मधील बॉम्बस्फोटांचा तपास मारियांनी केला होता. त्यामुळे हे पत्र त्यांना उद्देशून लिहिले असावे, असा अंदाज आहे.

काय आहे या पत्रात ?
मुंबई पुलिस ने 1993 में मुंबई को बचा लिया था, पर इस बार नहीं बचा पायेंगे.अगर बचा सकते हो तो बचा लो. U were lucky in 1993 but not this time. Stop us if u can. गाझा का बदला हम लेंगे,जरूर लेंगे..इस बार तुम भुगतोगे. Stop us... If u can.. - मुजाहिदीन..