आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या \'सीझर\'चा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 26/11 हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या श्वानपथकातील 'सीझर' श्वानाचा (डॉग) मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी सीझरला अखेरचा न‍िरोप दिला. सीझरला तिरंग्यात लपेटले होते.

सीझर हा लेब्राडोर रिट्रीवर ब्रीडचा डॉग होता. मुंबई पोलिस तपासात त्याची मदत घेत होते. त्याच्या मृत्यूने अनेक सेलिब्रिटीजनी 'ट्वीट' करून दु:ख व्यक्त केले आहे.

पोलिस आयुक्त आणि सेलेब्सने 'ट्वीट' करून केला सीझरच्या कर्तृत्त्वाला सलाम...
- 26 नोव्हेंबर 2008 रोज मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात 11 वर्षीय सीझरने मुंबई पोलिसांना मोलाचे योगदान दिले होते.
- मुंबईतील विरारमधील एका फॉर्ममध्ये सीझरने अखेरचा श्वास घेतला. रिटायरमेंट नंतर आपल्या तीन साथीदारांसोबत सीझरला ठेवण्यात आले होते.
- सीझरला ऑर्थराइटिसचा आजार होता.
- तो 105 डिग्री तापाने फणफणला होता. त्याला बॉम्‍बे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्‍टी अगेंस्‍ट अॅनिमल्‍समध्ये दाखल करण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, सीझरने वाचवले होते अनेकांचा जीव....
बातम्या आणखी आहेत...