आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या पोलिसांचा मॉडेलवर बलात्कार, दोन पोलिसांसह सहा जण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिसांनी एका मॉडेलवर बलात्कार करून तिची रोख रक्कम व दागिने लंपास केल्याची घटना मुंबईत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मॉडेलने पोलिस आयुक्तांना एसएमएस करून याबाबत तक्रार दिली हाेती. त्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष मॉडेलची तक्रार ऐकून घेत दाेषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी दाेन पाेलिस अधिकारी, एक महिला पाेलिसासह सहा जणांना अटक करण्यात अाली.

पीडित मॉडेलने २१ एप्रिल रोजी पोलिस आयुक्तांना एसएमएस करून आपल्यावर पोलिसांनी बलात्कार केल्याची तक्रार करून मदतीची याचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी पीडितेला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसीतील तीन पोलिस कर्मचारी व इतर तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.