आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबई पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून 40 कपल पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मड आयलॅंड आणि अक्सा परिसरातील हॉटेल्सवर धाड टाकून पोलिसांनी 40 कपल्सना पकडले. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त विक्रम देशपांडे यांच्या नेतृत्वात मालवणी पोलिसांनी दुपारी 3 च्या सुमारास वेगवेगळे लॉज आणि टु स्टार हॉटेल्सवर धाड टाकल्याचे समजते. दरम्यान, यावर सोशल मीडियातून जोरदार टीका केली जात आहे. या कपल्सना पकडण्यासाठी ते काही दहशतवादी नाहित, असे मत मांडले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रथम एका लॉजवरील खोलीवर धाड टाकली होती. कपलची चौकशी केल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील लॉज आणि टू स्टार हॉटेल्सवर धाडी टाकल्या. यावेळी 40 कपल्सना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यावेळी पोलिसांनी वाईट वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही तरुणींना महिला पोलिसांनी कानाखाली मारल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
पकडण्यात आलेल्या 40 कपल्सपैकी बहुतेक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पोलिस ठाण्यात आणल्यावर त्यांना कुटुंबीयांना फोन करण्यास लावण्यात आले. एका तरुणीने तर या घटनेने प्रचंड धक्का बसला असून मी आत्महत्या करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले आहे.
एक तरुणी तिच्या भावी नवऱ्यासोबत हॉटेल रुममध्ये होती. पोलिसांनी आकारलेला दंड देण्यास नकार दिल्यावर तिच्या कानाखाली मारण्यात आली. दंड आकारल्यावर कपल्सना सोडण्यात आले. पण तब्बल पाच तास त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
बॉम्बे पोलिस अॅक्टमधील सेक्शन 110 अंतर्गत कपल्सवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर दंड आकारण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित काही फोटो...