आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Raid Lodges And Hotels And Held 40 Couples

PHOTOS : हॉटेलमध्‍ये छापा मारून कपल्सना पकडणे पोलिसांच्‍या अंगलट; वाचा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारवाईदरम्‍यानचे सीसीटीव्‍ही फुटेज. - Divya Marathi
कारवाईदरम्‍यानचे सीसीटीव्‍ही फुटेज.


मुंबई- शहरातील मड आयलॅंड आणि अक्सा परिसरातील हॉटेल्सवर पोलिसांनी धाड टाकून 40 कपल्सना पकडले होते. शिवाय सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. मात्र, ही कारवाई पोलिसांच्‍या चांगलीच अंगलट येणार आहे. 'बंदखोली आड एकांतामध्ये एक महिला आणि एक पुरुष परस्परसंमतीने कुठले संबंध ठेवत असतील तर त्यामुळे सार्वजनिक नीतीमत्तेला धोका कसा पोहचतो,' असा कायदेशीर प्रश्‍न कारवाई झालेल्‍या तरुण-तरुणींनी उपस्थित केला आहे. परिणामी, मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे या प्रकरणात कारवाई करणारे पोलिस चांगलेच अडचणीत येणार आहेत.
सोशल मीडियातून झाली जोरदार टीका
पोलिस उपायुक्त विक्रम देशपांडे यांच्या नेतृत्वात मालवणी पोलिसांनी रविवारी दुपारी 3 च्या सुमारास वेगवेगळे लॉज आणि टु स्टार हॉटेल्सवर धाड टाकली. दरम्यान, यावर सोशल मीडियातून जोरदार टीका केली जात आहे. या कपल्सना पकडण्यासाठी ते काही दहशतवादी नाहीत, असे मत मांडले जात आहे.
कपल्सना नेले होते पोलिस ठाण्‍यात
पकडण्‍यात आलेल्‍या 40 कपल्सना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्‍यात नेण्‍यात आले होते. यावेळी पोलिसांनी वाईट वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही तरुणींना महिला पोलिसांनी कानाखाली मारल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. कडण्यात आलेल्या 40 कपल्सपैकी बहुतेक कॉलेजचे विद्यार्थी होते. पोलिस ठाण्यात आणल्यावर त्यांना कुटुंबीयांना फोन करण्यास लावण्यात आले. एका तरुणीने तर या घटनेने प्रचंड धक्का बसला असून मी आत्महत्या करण्याचा विचार करीत असल्याचेही सांगितले होते.

एक तरुणी तिच्या भावी नवऱ्यासोबत हॉटेल रुममध्ये होती. पोलिसांनी आकारलेला दंड देण्यास नकार दिल्यावर तिच्या कानाखाली मारण्यात आली. दंड आकारल्यावर कपल्सना सोडण्यात आले. पण, तब्बल पाच तास त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....