आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस म्हणाला,\'मला खूश कर,सोडून देईल\', पीडित मॉडेलची \'आपबिती\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- दिल्ली पाठोपाठ मुंबई देखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे एका घटनेवरून समोर आले आहे. दिल्लीत गुन्हेगारांकडून बलात्काराचे प्रकार होतात. परंतु, मुंबईत पोलिसच बलात्कारी असल्याचे आरोप एका उच्चशिक्षित मॉडेलने केले आहेत.
29 वर्षीय मॉडेलने सांगितले की, 3 एप्रिलला रात्री एक सिनेमा साइन करण्यासाठी ती हॉटेल 'हॉलीडे इन' पोहोचली होती. एक गुजराती बिझनेसमन सिनेमाला फायनान्स करत होता. माझ्या मॉडेलिंग को-आर्डिनेटरने सायनिंग अमाउंट घेऊन तेथून जाण्यास सांगितले. बिझनेसमन माझ्यासोबत रुमपर्यंत आला. तितक्यात त्याचा मित्र तेथे आला. दोघे मला पार्किंगमध्ये सोडायला आले. तितक्यात सहा लोकांनी आम्हाला घेराव घातला. ही पोलिस रेड असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी मला प्रॉस्टिट्यूट असल्याचा आरोप केला. नंतर मला साकी-नाका पोलिस ठाण्‍यात घेऊन गेले. मी त्यांच्या हातापाया पडल्या. त्यांना कळकडीची विनंती केली. परंतु त्यांना माझ्यावर दया आली नाही. एपीआय सुनील खातपे याने माझ्या कानात मारली. त्याच्या एका सहकार्‍याने माझे ऑस्ट्रेलियातील कंपनीचे जुने ओखळपत्र पाहिले आणि म्हणाला. 'तुझ्याकडे तर खूप रुपये असतील'. एएसआय सुरेश सूर्यवंशीने माझा आयफोन हिस्कावला आणि त्यावर 'फेसबुक' करील माझे फोटो पाहू लागला.

रात्री तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी मला संघर्ष नगर पोलिस चौकीत नेले. सकाळी पाच वाजेच्या सुमारास एपीआय सुनील खातपेने उपस्थित पोलिसांना बाहेर जाण्यास सांगितले. रुमच्या दरवाज्याला आतून कडी भरली. मी खापतेला पोलिसांना बाहेर का काढले, असा प्रश्न केला असता. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, 'मला खूश कर, तूला सोडून देईल. मी आरडाओरड केली परंतु कुणीच मदत केली नाही. त्याने माझी अब्रु लुटली आणि बाहेर निघून गेला. नंतर एक महिला कॉन्स्टेबल आली आणि ज्वेलरी, रोख रक्कम घेऊन गेली. सकाळी 7 वाजता खातपे पुन्हा आला. त्याने पुन्हा माझ्यावर बलात्कार केला. दोन तासांत त्याने दुसर्‍यांचा माझ्यावर अत्याचार केला. नंतर 9 वाजता पोलिसांनी मला साकी-नाका पोलिस ठाण्‍यात नेले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. माझ्या मित्राने पोलिसांना सुमारे 4 लाख 35 हजार रुपये दिल्यानंतर कुठे त्यांनी मला सोडले.

त्यानंतरही एपीआय खापते मला फोन करून अनेकदा ब्लॅकमेल केले. त्याने मला माझ्या घरी येण्याचीही धमकी दिली. कारण माझ्या घराचा पत्ता त्याच्याकडे आहे. मी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्‍यासाठी पोलिस ठाण्यातही गेली. परंतु, माझे कुणीच ऐकून घेतले नाही. अखेर 21 एप्रिलला पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन त्यांना 'आपबिती' सांगितली. मारिया यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

मुंबईत असल्यामुळे मी सुरक्षित असल्याचे माझे मित्र मला नेहमी सांगायचे. परंतु तो त्यांचाभ्रम होता. दिल्लीत गुन्हेगारांपासून महिलांना धोका आहे. परंतु, मुंबई तर पोलिसच बलात्कारी असल्याचे पीडित मॉडेलने आरोप केले आहेत.

पोलिस अधिकार्‍याने दोनदा बलात्कार केल्याचे घटनेने तिचे आयुष्यच बदलून गेले आहे. एमबीए झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमध्ये नोकरी करून अभिनयाच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी एक वर्षापूर्वी मुंबईत आलेल्या या मॉडेलने आता पुन्हा आपला जुना कन्सल्टन्सी व्यवसाय सुरु करण्‍याचा निर्णय घेतला आहे.